"मुंबईत जे घडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये अन्यथा...", एस. जयशंकर कडाडले
27-Oct-2024
Total Views | 95
मुंबई : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) हे रविवारी २७ ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा जर अशी घटना घडल्यास प्रत्युत्तर दिले जाईल, असे जयशंकर यांनी रविवारी सांगितले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मुंबईत जे घडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये. जिथे दहशतवादी हल्ला झाला आणि कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
पुढे जयशंकर म्हणाले की, भारत देश ज्यावेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यपदी होता तेव्हा ते दहशतवादाविरोधी समितीचे अध्यक्ष होते. ते म्हणाले की, आम्ही दहशतवादाविरोधी समितीची हॉटेलमध्ये बैठक घेतली होती. जिथे दहशतवादी हल्ला झाला होता. आज आपण दहशतवादासोबत लढण्यासाठी एकत्र असल्याचे जयशंकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ज्यावेळी आपण दहशतवादाच्या सहिष्णुतेबाबत बोलत आहोत, तेव्हा हे स्पष्ट होते की, जेव्हा कोणी काही करेल तेव्हा त्याला प्रत्युत्तर दिले जाईल. भारताला हे मान्य नसेल. हा एक बदल असल्याचे जय शंकर म्हणाले आहेत. आम्ही दहशतवादाचा पर्दाफाश करू आणि जिथे कारवाई करायची आहे तिथे कारवाई करू, असे जयशंकर म्हणाले होते.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर म्हणाले की, राज्यात केंद्र सरकारसारखी विचारधारा असलेल्या सरकारची गरज आहे. 'विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी विकसित महाराष्ट्र आवश्यक' असल्याचे ते मुंबईतील पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना त्यांनी मत मांडले.