रुस्तम, अकबर आणि बाबू यांचे राम मंदिरात नमाज पठण

धार्मिक भावना दुखावणारे कृत्य

    27-Oct-2024
Total Views |

Namaz
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील प्रभू श्रीराम मंदिरात तीन मुस्लिम व्यक्तींनी जबरदस्तीने नमाज (Namaz) पठण केल्याची घटना घडली आहे. रुस्तम, अकबर आणि बाबू खान अशी आरोपींची नावे असून त्यांचे वय हे ६५ ते ८५ दरम्यान आहे. पोलिसांनी या तिघांविरुद्ध एफआरआय नोंदवून त्यांना ताब्यात घेतले, मात्र नंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. ही घटना शनिवारी २६ ऑक्टोबर २०२४ घडली. हे कृत्य त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे सांगत स्थानिक हिंदू समुदायाने कठोर कारवाईची मागणी केली.
 
प्रसारमाध्यमानुसार, शाहापूर सलसलाई पोलीस ठाणे क्षेत्रातील किलोडा गावात ही घटना घडली. हिंदूंसाठी भगवान रामाचे मंदिर हे मुख्य श्रद्धास्थान आहे. मंदिराचे पुजारी ओमप्रकाश शर्मा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच ८५ वर्षीय अकबर, ६५ वर्षीय रुस्तम आणि ७० वर्षीय बाबू खान हे सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास मंदिरात आले होते. या तिघांनी मंदिरात ठेवलेल्या माठातील पाण्याने हातपाय धुतले आणि मंदिराच्या आवारात बसून त्यांनी नमाज अदा केल्याने पुजाऱ्याने तक्रार केली.
 
 
 
ओमप्रकाश यांनी पुढे सांगितले की, तिघांनी पुजाऱ्याच्या विरोधाला न जुमानता तिन्ही आरोपी सुमारे २० मिनिटे मंदिराच्या आवारात येऊन थांबले आणि नंतर तिथून निघून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे भाऊ बँकेत काही काम करत होते. त्यानंतर तिघेही मंदिराच्या आवारात बसून नमाज अदा करु लागले होते. पुजाऱ्यांनी आरोपींना विरोध केला. मात्र यावेळी कट्टरपंथींनी पुजाऱ्याचे ऐकले नाही. आपलाच मनमानी कारभार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही वेळाने कट्टरपंथी नमाज अदा करून मंदिरातून निघून गेले.
 
यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याती मागणी पुजारी करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करुन बाबू, रुस्तम आणि अकबर यांना ताब्यात घेतले असून आणि चौकशीदरम्यान आरोपींनी आपली चूक मान्य केली. याप्रकरणी आता पोलिसांनी या तिघांविरोधात एफआरआय दाखल केली आहे.