पुणे - 'डिकॅथलाॅन'च्या आवारात बिबट्याचा वावर; असे पार पडले रेस्क्यू आॅपरेशन

    26-Oct-2024
Total Views | 232
decathlon


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पुण्यातील वाघोलीमधील डिकॅथलाॅनच्या आवारात शुक्रवार दि. २५ आॅक्टोबर रोजी आढळलेल्या जखमी बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश मिळाले आहे (leopard rescued from decathlon). रेस्क्यू-पुणे यांच्या मदतीने हे बचावकार्य पार पडले. या नर बिबट्याच्या पायाला इजा झाली असून सध्या त्याच्यावर पुण्यातील वन्यजीव बचाव केंद्रात उपचार सुरू आहेत. (leopard rescued from decathlon)
 
 
शुक्रवार दि. २५ आॅक्टोबर रोजी पहाटे डिकॅथलाॅनच्या परिसरात जखमी बिबट्या आढळून आला. दुकानाच्या सुरक्षारक्षकांना पहाटे ४.५५ वाजता दुकानाच्या आवरात बिबट्याचे दर्शन घडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज तपासल्यानंतर देखील दुकानाच्या आवारात बिबट्याचा वावरावर शिक्कामोर्तब झाले. वन विभागाला कळवल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले. सकाळी १० आणि दुपारी १ वाजता कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्याचे छायाचित्र कैद झाले. या छायाचित्रांमध्ये बिबट्या लंगडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बिबट्याला पकडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रेस्क्यू-पुणेच्या कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले.
 
 
दरम्यानच्या काळात बिबट्याने दुकानाच्या मागे असलेल्या उसाच्या शेतांमध्ये आसरा घेतला. रेस्क्यू-पुणेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी ५.३० वाजता उसाच्या शेताच्या परिसरात दोन पिंजरे लावले. त्यामधील एका पिंजऱ्यात रात्री ११ वाजता बिबट्या अडकल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने त्याला बावधन येथील वन्यजीव बचाव केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी दिली. या बिबट्याच्या पायाला इजा झाली असून त्याच्यावर सध्या रेस्क्यू-पुणेच्या मदतीने वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121