उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन; जागतिक कंपनी एचसीएल सॉफ्टवेअरसोबत करार

    26-Oct-2024
Total Views |
indian startups hcl software company
 

मुंबई :      भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी व राष्ट्रीय उत्पादन केंद्र बनविण्याच्या ध्येयाला पाठिंबा देण्यासाठी उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा(डीपीआयआयटी)ने मोठा निर्णय घेतला. डीपीआयआयटीने सॉफ्टवेअर सोल्यूशन्समधील जागतिक कंपनी एचसीएल सॉफ्टवेअर कंपनीसोबत मॅन्युफॅक्चरिंग इनक्युबेशन उपक्रमाकरिता धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली.




दरम्यान, भारताच्या स्टार्टअप क्रांतीची घोषणा करण्यासाठी डीपीआयआयटीने ने एचसीएल सॉफ्टवेअर सोबत भागीदारी केली आहे. स्टार्टअप उत्पादन परिसंस्थेमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. तर स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत, डीपीआयआयटीने आजवर विविध उद्योग भागधारकांबरोबर ८० हून अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे.

या उपक्रमाच्या उद्दिष्टांमध्ये स्टार्टअप्सना प्रोत्साहित करून भारतीय बौद्धिक संपदा विकसित करणे, स्टार्टअप्सना जागतिक मानकांशी जुळणारी जागतिक दर्जाची उत्पादने आणि कौशल्य प्रदान करून उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे. त्याचबरोबर, मजबूत उत्पादन परिसंस्था निर्माण करणे, पूर्ण उत्पादन मूल्य साखळीला समर्थन देण्यास सक्षम असलेले परस्पर जोडलेले स्टार्टअप आणि पुरवठादारांचे नेटवर्क स्थापित करणे यांचा समावेश आहे.