निजामाच्या क्रूर अत्याचाराविरोधात मराठवाड्याच्या हिंदूंनी तीव्र संघर्ष केला. प्रचंड बलिदान आणि त्यागाने मराठवाडा स्वतंत्र झाला. अशा या मराठवाड्यामध्ये नुकत्याच ‘लव्ह जिहाद’विरोधी अनेक सभा घेतल्या. त्यानिमित्ताने ‘लव्ह जिहाद’बद्दलचे मराठवाड्यातील वास्तवाचा मागोवा घेताना जे सत्य समोर आले, ते या लेखात सारांश स्वरूपात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न....
मराठवाड्यातल्या एका छोट्याशा गावातून ती पुण्याला शिकायला आली होती. अतिशय सुंदर मुलगी. आईबाबांची लाडकी. मुलीला पुण्यात कसलाच त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी स्वतंत्र रुम भाड्याने घेऊन दिला. सुरूवातीला सगळेच ठिक होते. मात्र, कालांतराने मुलगी आईबाबांशी संपर्क कमी करू लागली. संवादही तुटकच करू लागली. काय झाले असेल? या विचाराने आईबाबा अचानक मुलीच्या राहत्या घरी पोहोचले. तिथली परिस्थिती पाहून ते चक्रावले. कारण, त्यांची सुंदर, हुशार मुलीने हिजाब घातला होता. आईबाबांनी विचारणा केल्यावर तिने टाळाटाळ केली. आईबाबा तिथेच थांबले, तर तिने मोजून पाच वेळा नमाजही पढला. आईबाबांच्या रागाकडे, रडण्याकडे तिने तीळभरही लक्ष दिले नाही. आपल्या मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारला, हे सत्य स्वीकारेपर्यंत दुसरे सत्य उघड झाले. ते असे की, पुण्याला शिकत असताना तिच्या मैत्रिणीच्या संपर्कातून तिची ओळख एका मौलानाशी झाली. वयाने मोठा आणि हातभर दाढी वाढवलेला त्या मौलवीच्या जाळ्यात ती अडकली होती. दिसणे, वागणे आणि राहणीमान याबाबतीत मौलवी त्या मुलीच्या पासंगालाही पुरणारा नव्हता. आईबाबांच्या पायाखालची वाळू सरकली. तिच्या आईबाबांनी तिला समजावले, परोपरीने विनवले. पण, परिणाम शून्य. मुलीला परत आणण्यासाठी काय करावे या विचारात असतानाच ती मुलगी त्या मौलवीसोबत पळूनही गेली. आईबाबांनी त्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारही केली. तक्रारीनंतर ती मुलगी आणि तो मौलवी सापडला. पण, कुठे तर भारत-पाकिस्तान सीमेवरच्या गावात. ते पाकिस्तानमध्ये पळून जायचा प्रयत्नही करत असावेत, असा दाट संशय त्यांना आला. पोलिसांनी त्यांना पकडून गावी आणले. तिच्या पालकांना बोलावले. यावर मुलीचे म्हणणे होते की, “मी भारताची नागरिक आहे. मी अल्पवयीन नाही. मी माझ्या मर्जीने कुठेही आणि कुणाबरोबरही निकाह करू शकते. त्याच्याबरोबर कुठेही जाऊ शकते. तुम्ही काय, कुणीही मला कायद्याने अडवू शकत नाही.” हे ऐकून पोलीस आईबाबांना म्हणाले, “ती सज्ञान आहे. तिच्या इच्छेविरूद्ध आपण काहीही करू शकत नाही. आईबाबा रडत माघारी गेले. ती मुलगी आणि तो मौलवी कुठे आहे, याची त्यानंतर काही माहिती मिळालेली नाही. नुकतीच लातूरमध्ये घडलेली घटना. मराठवाड्यामध्ये अशाच घटना कमी जास्त संख्येने घडत आहेत.
बीडमधली एक घटना. पालक खरेदीसाठी बाहेर गेले होते. येईपर्यंत भात भाजी शिजवून ठेव, असे आईने तिला सांगितले होते. मात्र, घरात गॅस सिलिंडर संपले होते. गॅस सिलिंडर वाहणारा माणूस आला. तो सिलिंडर देऊन गेला. घरात एकट्या असलेल्या मुलीला गॅस सिलिंडर जोडणी कशी करावी माहिती नव्हते. कारण, नेहमी आई किंवा बाबा ते काम करायचे. आजूबाजूला सगळे जण कामात होते. तिने घरासमोर उभ्या असलेल्या थोड्या परिचीत मुस्लीम पुरूषाला गॅस जोडणी करण्याची विनंती केली. त्याने दोन मिनिटांत गॅस जोडणी केली आणि तिच्याशी बोलू लागला. ‘अरे तुम इतनीसी बच्ची थी, अब बडी हो गई’ असे म्हणत त्याने तिची संपूर्ण चौकशी केली. काही काम असेल तर सांगत चल, असे म्हणत तिचा मोबाईल नंबर घेतला. काही दिवसांनंतर ती मुलगी त्या इसमासोबत पळून गेली. त्या व्यक्तीचा आधीचा निकाह झाला होता आणि त्याला मुले ही होती.
कुणी म्हणत की, प्रेम होते, निकाह केला, त्या मुलीची हत्या तर केली नाही ना? पण, खरंच का अजिबात न साजेशा पुरूषाशी हिंदू मुलीने निकाह केला, तर तिचे आयुष्य सुखात जात असेल? याचे सर्वेक्षण केले तर? अर्थात, सर्वेक्षण करण्याची आपली कितीही तयारी असली, तरी समोरच्या महिलेचे धर्मपरिवर्तनासोबतच मत आणि मनपरिर्वतन इतके झालेले असते की, त्या सर्वेक्षणामध्ये जीव गेला, तरी सहभागी होणार नाहीत. सहभागी झाल्यातरी ‘अल्ला का रेहम करम हैं, मै खुशनसीब हू’ या पलीकडे त्या काहीही बोलणार नाहीत.
तर मराठवाड्यातील महिलांशी संवाद साधला. त्यांच्या चर्चेचा सारांश असा की, मुली छत्रपती संभाजीनगर किंवा पुण्यात शिकायला जातात. मुलीला शिकायला निवांतपणा मिळावा, म्हणून आईबाबा स्वातंत्र रुम घेऊन देतात. दररोज रात्री ठराविक वेळेत व्हिडिओ कॉल करून मुलीशी बोलतात. खरे तर मुलगी काय किंवा मुलगा काय, दुसर्या शहरात शिकत असताना त्याला स्वतंत्र रुम घेऊन देण्याची गरज नाही. कारण, तिथे ते एकटे असतात. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसते. मात्र, ते जर वसतिगृहात असते, तर त्यांच्यावर नियंत्रण असते. संबंधितांचे लक्ष असते. त्यांच्याकडून काही ही गैरवर्तणूक झाली, तर आईबाबांना लगेच कळवण्याची शाश्वती असते. तसेच दररोज ठराविक वेळेत व्हिडिओ कॉल केल्यावर मुलामुलींना माहिती असते की, याच वेळेत आईबाबांचा फोन येणार आहे. त्यामुळे त्यावेळेस ते सजग राहतात. संबंधित पालकांनी मुलांना अचानक भेटायला जावे. सातत्याने संपर्क ठेवावा. मुलगी-मुलगा जिथे राहतो तिथल्या शेजार्यांशी संपर्क ठेवावा. त्या शहरात आपले नातेवाईक किंवा मित्र परिवार असेल, तर त्यांनाही मुलगा/मुलगीची काळजी घेण्यासंदर्भात सूचना द्यावी. तसेच, प्रत्येक शहरात देशप्रेमी आणि धर्मसंस्कार प्रेमी रा. स्व. संघ, राष्ट्र सेविका समिती कार्यरत आहे. आपली मुलगा किंवा मुलगी तुमच्या शहरात या या ठिकाणी शिकण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी राहते, याची माहिती त्यांना द्यावी. जेणेकरून या संघटनेतील निस्वार्थी स्वयंसेवक/भगिनी शहरात राहायला आलेल्या या मुला- मुलींची पालकांच्या मायेने काळजी घेतील.
काही महिलांनी सांगितले की, “मुलगी किंवा मुलगा जाळ्यात फसतोय याची माहिती त्यांच्या पालकांना दिली, तर पालक लक्ष देत नाहीत. पुढे काही दुर्देवी प्रसंग आला की दु:खी होतात. पण, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.” तर या महिलेचे म्हणणे होते की, मुला-मुलीसंदर्भात कुणी काही माहिती देत असेल, तर त्यावर पालकांनी चिडू नये, तर त्या गोष्टीची सत्यता तपासावी. ज्याने माहिती दिली, त्याला वादामध्ये ओढूही नये. कारण, त्यामुळे फसलेल्या मुलामुलींबाबत माहिती असली, तरी ती सांगायला लोक घाबरतात. तर एका महिलेचे म्हणणे ”आपले लेकरू ‘लव्ह जिहाद’ किंवा ‘ड्रग्ज जिहाद’च्या जाळ्यात अडकले, तर त्यांचे आईबाबा हातपाय गाळतात. त्यांनी तसे न मानता पळून गेलेली मुलगी कुठेही गेली, तरी ती कुठे आहे याचा मागोवा घ्यावा. पळून गेलेली मुलगी मुस्लीम रितीरिवाज सहज स्वीकार करत नाही. हिजाब घालणे वेगळे आणि विरूद्ध संस्कृतीत राहून कधीही न खाललेले गाईबैलाचे मास शिजवून खाणे वेगळे. नमाज पढणे वेगळे आणि शौहर कधीही त्याच्या कौमची दुसरी बिबी आणू शकेल आणि तलाक देईल, या दहशतीत जगणे वेगळे. तिला माहेरचे सर्व दरवाजे बंद झालेले असतात. अशावेळी सदासर्वकाळ मुलांना जन्म देत राहायचे आणि शौहरसकट त्याच्या सगळ्या नातेवाईकांची मर्जी सांभाळायची. या व्यतिरिक्त बिचारीकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. अशावेळी दुधावरच्या साईसारख्या लेकीसोबत आईबाबांनी संपर्क ठेऊन तिला परत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण, लेक आपली आहे. काळीज आपले आहे.” तिच्या या बोलण्याला सगळ्याच महिलांची संमती होती.
असो. या सगळ्या महिलांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक कंत्राट हिंदूंकडे असली, तरी मजदूर म्हणून काम करणारे हिंदू नाहीत. प्लम्बिंगपासून रंगारी कामापर्यंत, फळ विक्रेत्यापासून इतर अनेक छोटी-मोठी कामे करताना इथे हिंदू व्यक्ती दिसतच नाही. बहुतांशी मुस्लीम व्यक्ती ही कामे करताना दिसतात. मात्र, अशा परिस्थितीमध्येही ’हमने हजार साल तुमपे राज किया और आगे भी करेंगे’ अशा मानसिकताही आहे. ‘१५ मिनिट में पोलीस हटा दो’ म्हणणार्या ओवेसीचा हिंदूंना राग येतो. पण, या मराठवाड्यात ओवेसीचे विधान सत्य मानणारेही त्याच्या कौमचे लोक आहेत. दुसरीकडे, या सगळ्या महिलांनी एक खंत बोलून दाखवली, त्या म्हणाल्या, “आमचा मराठवाडा निजामाच्या टाचेखाली चिरडला जात होता. निजामाच्या तलवारीच्या भितीला किंवा त्याने दिलेल्या प्रलोभनाला आमचे पूर्वज बळी पडले नाहीत. आमच्या पूर्वजांनी भयंकर संघर्ष केला. त्यामुळे आज आम्ही हिंदू म्हणून अभिमानाने जगत आहोत. पण, सोशल मीडियावर सगेसोयरे आंदोलन करणारे आमचे नेते मौलवीची भेट घेतानाचे दृश्य पाहिले. समाजाचा नेता असे करत असेल, तर आम्ही त्यांच्या अनुयायांनी आणि आमच्या लेकरांनी काय करावे? आमच्या लेकीबाळींना फुस लाऊन पळवून नेणार्यांच्या विरोधात काय करावे?” महिलांच्या भावना तीव्र होत्या.
या आयाबायांशी बोलताना त्यांच्यात एक दुवा समान होता, तो म्हणजे त्यांचे मत आणि विश्वास होता की ”केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तसेच, राज्यात हिंदुत्ववादी सत्ता आहे, म्हणून आम्ही आज उघड उघड ‘लव्ह जिहाद’ विरोधात बोलू शकतो. आमच्या तक्रारी पोलिसात दाखलही होतात आणि गुन्हेगाराला सजाही मिळते. २०१४ सालापूर्वी केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजप सत्तेत नसताना ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडल्या तरी, सुद्धा त्याविरोधात ‘ब्र’ सुद्धा बोलण्याची हिंमत नव्हती.”
एकंदर निजामशाहीला टक्कर देणारा मराठवाडा आज ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’विरोधात टक्कर देतोय.
जातीपातीच्या आधारे मराठवाडाकरांना तोडू पाहणारे कितीतरी जण आहेत. मात्र, त्या सगळ्या आड हिंदू म्हणून मराठवाडा जागा आहे. अगदी तसाच जसा मराठवाडा निजामाविरोधातल्या संघर्षामध्ये जागृत होता!
असेही अनुभव...
आंबाजोगाई येथे ‘लव्ह जिहाद’ विषयावर एका सभागृहात बोलत होते. ३०० च्यावर महिला होत्या. माझ्या सोबत माझी सुरक्षा रक्षक शुभांगी जाधव होती. तिच्या लक्षात आले की, जाळीदार टोपी घातलेले तीन युवक आम्ही होतो तिथे वरच्या मजल्यावर होते. मी ‘लव्ह जिहाद’च्या घटना सांगत होते, तेव्हा ते एकमेकांना टाळ्या देत चक्क हसत होते. तसेच चोरून आमच्या संवादाची रेकॉर्डिंग करत होते. तिने हे तत्काळ तिथल्या काही स्थानिक लोकांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी त्वरित या तिघांचीही गंचाडी पकडली, त्या तिघांना व्हिडिओ रेकोर्डिंग डिलीट करायला लावली. ‘तुम्ही इथे कसे पोहोचलात’ असे विचारल्यावर, त्यांचे उत्तर होते -इथल्या रंगकाम करण्याच्या मजुरीचे काम आम्हाला दिले. आम्ही वर काम करत होतो. पण, भाषण ऐकून बाहेर आलो. थोडक्यात, जिहाद वगैरे ऐकल्यावर त्यांचे कान टवकारले होते. दुसरीकडे औसा येथे ‘लव्ह जिहाद’-समाज वास्तव या विषयावर ग्रामीण भागातील महिलांशी संवाद साधत होते. १५० महिला होत्या. मोकळा माळ होता. वर केवळ छप्पर होते आणि पत्र्याचा आडोसा होता. इथेही शुभांगीच्या लक्षात आले की, अचानक बाहेर टोपी घातलेले दोन हट्टेकट्टे तरूण बाईकवरून घिरट्या घालू लागले. फोनाफोनी करू लागले. अत्यंत अस्वस्थपणे ते बाहेर येरझरा घालत होते. माईकवरून बोलत असल्यामुळे त्यांना माझा आवाज ऐकू येत होता. शुभांगीने याबाबत तिथल्या काही लोकांना सांगितले. तत्काळ धावून त्यांनी त्या दोघांना पकडले. ते दोघे म्हणू लागले ”आम्ही तर मजूदर आहोत, सभागृहाच्या पलीकडे प्लम्बिंगचे काम करतो. या मॅडमचे भाषण ऐकत थांबलो.” अर्थात, त्यांनी असे बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांची खबरबात घेतलीच म्हणा!