राहुल गांधी आणि ओवैसी बिश्नोई गँगचे पुढचे टार्गेट ?
25-Oct-2024
Total Views | 98
वाराणसी : बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गँग देशभर चर्चेत आली आहे. बाबा सिद्दीकीने सलमान खानशी मैत्री असल्यामुळे त्याला याचे परिणाम भोगावे लागले असे बिश्नोई गँगने सांगितले आहे. अशातच, आता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मारण्याची धमकी दिली आहे. याच सोबत, एआयएम्आयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे सुद्धा बिश्नोई गँगच्या हिटलिस्ट वर असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
बाबा सिद्दीकीचा खून केल्यानंतर, अशाच पद्धतीने फेसबुक वर पोस्ट करत हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली होती. या प्रकरणाता बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी सुद्धा गँगच्या टार्गेट वर होता. सलमान खान याच्याशी जे लोक जवळीक साधतील त्यांची हीच अवस्थता होईल हे बिश्नोई गँगचे म्हणणे आहे. या प्रकरणानंतर, सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या सगळ्या गदारोळात आता राहुल गांधी आणि ओवैसी हे सुद्धा सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण पसरले आहे. बाबा सिद्दीकीनंतर आता राहुल गांधी आणि ओवैसी यांचा नंबर लागला पाहिजे असे मत पोस्टकर्त्याने व्यक्त केलं आहे.
राहुल गांधी आणि ओवैसी यांचे फोटो फेसबुक पोस्टमध्ये शेअर करत एका अज्ञात व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईचे कौतुक केले आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून वाराणसीमध्ये या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.