अमेरिका असो की चीन, कुणीही भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही: अर्थमंत्र्यांचे वॉशिंग्टनमधील चर्चेत वक्तव्य

    24-Oct-2024
Total Views |
america-or-china-no-country-can-ignore-india

 
 
मुंबई :     आजघडीला भारताकडे कोणताही देश मग तो अमेरिका असो वा चीन कुणीही दुर्लक्ष करु शकत नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका चर्चासत्रात म्हटले आहे. वॉशिंग्टन येथील सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटने आयोजित केलेल्या 'ब्रेटन वुड्स ॲट 80: प्रायोरिटीज फॉर द नेक्स्ट डिकेड' या चर्चेत अर्थमंत्री सीतारामण यांनी सहभाग घेतला.




भारताचे प्राधान्य वर्चस्व प्रस्थापित करणे नाही तर प्रभाव वाढविण्यावर असून भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपली लोकसंख्या सर्वाधिक आहे हे दाखवून आपले वर्चस्व प्रस्थापित करणे हा भारताचा प्राधान्यक्रम नाही. त्याऐवजी आमचा प्रभाव वाढविणे हेच ध्येय असल्याचेही अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण ब्रेटन वूड्स संस्थांच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी वॉशिंग्टन येथे दाखल झाल्या. त्या म्हणाल्या, जगातील सहापैकी एक व्यक्ती भारतीय असून आपण आपली अर्थव्यवस्था आणि ती ज्या प्रकारे वाढत आहे त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. देशातील तंत्रज्ञानातील आघाडीच्या भूमिकेचा उल्लेख करताना भारतीयांकडे जटिल कॉर्पोरेट प्रणाली चालवण्याची क्षमता आहे, असेही सीतारामण यावेळी म्हणाल्या.