न्यूझीलंड २५९ धावांवर गारद, वॉशिंग्टन सुंदरच्या गुलिगत ७ विकेट्स!
टीम इंडियाचं झापूक झुपूक प्रदर्शन
24-Oct-2024
Total Views | 21
पुणे : न्यूझीलंड विरूद्ध टीम इंडिया (Washington Sundar) दरम्यानचा दुसरा कसोटी सामना दि: २४ ऑक्टोबर रोजी पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर सुरु आहे. नाणेफेकीच्या बळावर किवींनी पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियासमोर २५९ धावांवर किवींचा संघ गारद झाला आहे. यामध्ये टीम इंडियाच्या वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या कामगिरीने थक्क केले आहे. सुंदरने किवींचे ७ गडी बाद करत ५९ धावा दिल्या असून झापूक झुपूक प्रदर्शन केले आहे.
तसेच दुसऱ्या बाजूला आर. अश्विनने वॉशिंग्टन सुंदर याला चांगली साथ दिली. टीम इंडियाच्या या फिरकी जोडीने पाहुण्या किंवींचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजीनंतर आता संघाच्या फलंदाजांवर संघाची आणि सामन्.ाची भिस्त असणार आहे.
टीम इंडिया संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड संघ : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.