4000 कोटींचा खजिना, हिजबुल्लाहला निधी पुरवणाऱ्या बँकेवर इस्त्रायली हल्ला!

    22-Oct-2024
Total Views |
israel-bombs-hezbollah-associated-financial-institution


नवी दिल्ली : 
  इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात गेल्या काही काळापासून जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यातच आता इस्रायली सुरक्षा दलांनी हिजबुल्लाहच्या दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवणाऱ्या बँकेवर बॉम्बहल्ला केला आहे. लेबनॉनमध्ये या बँकेच्या अनेक शाखांवर बॉम्बस्फोट झाले असून इस्रायलने हिजबुल्लाहने हॉस्पिटलखाली सोने आणि लाखो डॉलर्स लपवून ठेवल्याचा खुलासाही करण्यात आला आहे.




दरम्यान, दि. २१ ऑक्टोबर २०२४ इस्रायलने बेरूतमधील अल कार्द अल हसन नावाच्या वित्तीय संस्थेच्या शाखांवर बॉम्बफेक केली. ही इस्लामिक बँकिंग संस्था असून ती व्याजावर चालत नाही. हिजबुल्ला आपल्या आर्थिक कारवाया बँकेमार्फत चालवते, असा संस्थेवर आरोप देखील करण्यात आला आहे. २००७ मध्ये या संस्थेवर अमेरिकेने बंदी घातली होती. त्यानंतर देखील हिजबुल्ला लेबनीज लोकांना ही सुविधा वापरण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

मागील काळात या बँकेचाय सर्व्हर हॅक झाल्यानंतर खातेदारांची नावे समोर आली त्यात हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांची नावे देखील असल्याचे समोर आले होते. हिजबुल्लाह प्रमुख नसरुल्लाह याने समर्थकांना त्यांच्या पैशातील प्रत्येक पैसा या संस्थेत जमा करण्यास सांगितला. दरम्यान, सद्यस्थितीस झालेल्या संघर्षात इस्त्रायलने बेरूतमधील हिजबुल्लाच्या 15 शाखांना आपले आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी लक्ष्य केले.






अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ईडीची टांगती तलवार

हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ईडीची टांगती तलवार

सक्तवसुली संचालनालयाने हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले. २७.५ कोटी किंमतीचे शेअर्स आणि दालमिया सिमेंट्स लिमिटेड यांच्या मालकीची ३७७.२ किंमतीची जमीन तात्पुरीची जप्त केली आहे. यावर डीसीबीएलने म्हटले की, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ७९३.३ कोटी किंमतीची आहे. हा जप्तीचा खटला दाखल झाल्यानंतर १४ वर्षानंतर हा खटला सुरू करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाने जप्तीचा निर्णय केंद्रीय अन्वेशन ब्युरोने २०११ मध्ये भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यात ..

दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला; वक्फ बोर्डावरून महत्त्वपूर्ण चर्चा; काय घडलं?

दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला; वक्फ बोर्डावरून महत्त्वपूर्ण चर्चा; काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी गुरुवारी दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. त्यात व्यापारी नेते, व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षक आणि दाऊदी बोहरा समाजातील अनेक प्रमुख प्रतिनिधींचा समावेश होता. उपस्थितांनी वक्फ बोर्डासोबत असलेल्या आपल्या संघर्षाबद्दल सांगितले. शिष्टमंडळाने त्यांच्या समाजातील सदस्यांच्या मालमत्तेवर वक्फने चुकीचा दावा कसा केला हे देखील स्पष्ट केले. वक्फ दुरुस्ती कायदा आणल्याबद्दल शिष्टमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानल्याचे दिसून आले. PM talk ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121