अखेर हमासला 'ती' चूक महागात पडली! इस्रायलकडून चोख प्रत्युत्तर
20-Oct-2024
Total Views | 110
बेरूत : (Israel–Hamas war) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर, आता हिजबुल्लाहाला इस्रायलने चांगलाच धडा शिकवण्याच्या निर्णय घेतला आहे. बेरुत मधील हिजबुल्लाहाच्या शस्त्रसाठ्यांच्या आवारात हल्ला करत, इस्रायली सुरक्षा दलाने ३५ जणांचा खातमा केला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, नेतान्याहू यांच्या घरावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते घटनास्थळी नव्हते. या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचे मत एका वरिष्ठ इस्रायली सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केले. इराणने मात्र हा दावा फेटाळून लावत या मागे हिजबुल्लाहचा हात असल्याचे सांगितले.
याह्या सिनवार या हमासच्या नेत्याच्या मृत्यूनंतर आता युद्धविराम होण्याची शक्यता संपुष्टात आली असून, मध्य पूर्व भागात तणाव पूर्ण परिस्थीती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. बेरूतच्या दक्षिण भागात, इस्रायलने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरु केले. बहुतांश हिजबुल्लाहाच्या शस्त्रागारांवर हा हल्ला केला गेला जेणेकरुन संघटनेच्या मुळावर घाव घालण्यात येईल. इस्रायलच्या सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार लेबनॉन मधील हमासच्या मुख्यालयावर हल्ला चढवला आहे.
ही चूक महागात पडेल!
पंतप्रधान नेतान्याहू हे त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रीया देत म्हणाले हिजबुल्लाहाला ही चूक महागात पडेल. इराण आणि त्यांच्या संघटनेला याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी इस्रायलच्या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल त्याला मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही दहशतवादी आणि त्यांना पाठवणाऱ्यांचा खात्मा करत राहू. असे नेतान्याहू यांनी आपल्या X हँडल वरुन सांगितले.