घटना कोणतीही घडली तरी आम्ही मुस्लीम म्हणून वेगळे असून, आम्हांला विशेष वागणूक मिळणे आवश्यक असल्याची मागणी भारतातील मुस्लीम कायम करतात. यासाठी ते देशांतर्गत मुद्दा न मिळाल्यास, आंतरराष्ट्रीय मुद्यांचा आधार घेतात. इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्लाहचा नेता नसरल्लाहाच्या मृत्यूनंतर भारतातील प्रतिक्रियांचा घेतलेला आढावा...
भारतातील पुरोगामी वर्गाने मुस्लीम लांगूलचालन म्हणजेच धर्मनिरपेक्षता असा भ्रम पसरवला आहे. हा भ्रम एवढा घट्ट आहे की, कोणी हिंदूहिताची भाषा बोलल्यास त्यास तत्काळ फतवा काढून, धर्मांध ठरवण्यात येते. हा भ्रम राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विश्वामध्ये पसरवण्यासाठी, पुरोगाम्यांच्या अनेक पिढ्या कार्यरत होत्या आणि आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात प्रारंभी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात, या पुरोगाम्यांचे वर्चस्व शैक्षणिक विश्वात निर्माण होण्यास प्रारंभ झाला होता. त्यामुळे आजही या बेगडी धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलणारा मोठा वर्ग आहे. अर्थात, लांगूलचालन करताना हे लोक एवढे आंधळे होतात की, ’मुस्लीम ब्रदरहूड’ अथवा ’पॅन इस्लामिझम’ असे काही अस्तित्वात असते, हे त्यांना झेपतच नाही.
अर्थात, बुद्धीवर पुरोगामित्वाची सूज आल्यावर असे होणे साहजिकच आहे.’ मुस्लीम ब्रदरहूड’ अथवा ’पॅन इस्लामिझम’ केवळ मुस्लीम राजकीय नेत्यांपुरतेच अस्तित्वात आहे, असाही हास्यास्पद दावा हे लोक करतात. मात्र, त्यांचा हा दावा सर्वसामान्य मुस्लीम खोडून काढतात, हे विशेष. भारतातील मुस्लीम समुदायाच्या आवडत्या धार्मिक घोषणांमध्ये ‘तेरा मेरा रिश्ता क्या - ला इलाहा इल्लाल्लाह’ या घोषणेचा समावेश होतो. काश्मीरचे दहशतवादी असो किंवा सुधारित नागरिकत्व कायद्याच्या नावाखाली हिंसाचार करणारे इस्लामी दंगलखोर असो, प्रत्येक आंदोलनात ही घोषणा ऐकू येते. जामिया मिलिया इस्लामिया, अलीगढ मुस्लीम विद्यापीठापासून ते रस्त्यांवर आणि रस्त्यांवर होणार्या धार्मिक मेळाव्यांपर्यंत ही घोषणा अनेकदा ऐकायला मिळते. या घोषणेद्वारे हे लोक आपली निष्ठा ही केवळ इस्लामशीच असल्याचे दाखवून देतात. त्यामुळेच इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालेला हिजबुल्लाचा दहशतवादी हसन नसराल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरपासून लखनौपर्यंतच्या भारतीय मुस्लिमांमध्ये शोकाचे वातावरण आहे. नसराल्लाहच्या मृत्यूबद्दलचा शोक ही लखनौच्या शिया समुदायातील प्रतीकात्मक घटना होती. इमामबाडा येथील तीन दिवसीय शोक हे दर्शविते की, भारतीय मुस्लीम समुदाय, विशेषतः शिया मुस्लीम, जागतिक शिया नेत्यांशी त्यांचे संबंध किती गांभीर्याने घेतात.
भारतीय मुस्लिमांनी आपल्या देशात रस्त्यावर उतरणे, ही काही नवीन गोष्ट नाही. ‘सीएए’चा मुद्दा असो किंवा कोणतीही जागतिक इस्लामिक घटना असो, भारतीय मुस्लीम बहुसंख्य हिंदूंच्या विरोधात, निषेधाच्या रूपात आपला असंतोष व्यक्त करतात. विशेषतः बिगरमुस्लीम निर्वासितांसाठी असलेल्या ‘सीएए’वर मुस्लिमांचा राग प्रत्येक कायदा किंवा निर्णयात त्यांना त्यांच्या विरोधात काहीतरी कसे दिसते, हे दिसून येते. हा विरोध केवळ राजकीय किंवा सामाजिक नव्हता, तर धार्मिक भावनांशीही जोडलेला होता. ‘सीएए’च्या निषेधादरम्यान लावलेल्या घोषणांमध्ये ‘ला इलाहा इल्लाल्लाह’चा नारादेखील ऐकू आला, जे भारतीय मुस्लीम त्यांच्या निषेधांना धार्मिक रंग देण्यास मागे हटत नाहीत, हे दर्शविते. विशेष म्हणजे, जेव्हा भारतातील मुस्लिमांना त्यांच्या देशात कोणतीही समस्या सापडत नाही, तेव्हा ते आंतरराष्ट्रीय घटना मांडून आपला असंतोष दाखवतात. इस्त्रायल-पॅलेस्टाईन वाद असो किंवा इराक, सीरिया किंवा लेबनॉनमध्ये घडणार्या घटना असो, भारतीय मुस्लीम त्यांच्या निषेधांमध्ये या मुद्द्यांचा समावेश करतात.
मुस्लिमांच्या या विचारसरणीस खतपाणी घालण्याचे काम राजकीय नेतेही करताना दिसतात. नसराल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांचा निवडणूक प्रचार थांबवला. भारतातील मुस्लीम नेते आंतरराष्ट्रीय इस्लामिक मुद्द्यांचा राजकीय फायद्यासाठी कसा वापर करतात, हे यातून दिसले. मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहाला केवळ शहीद म्हणून सादर केले नाही, तर त्यांनी या प्रसंगाला मुस्लीम समाजाचा पाठिंबा मिळवण्याचीही संधी साधली. केवळ मेहबुबा मुफ्तीच नाही, तर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे श्रीनगर लोकसभा खा. रुहुल्ला मेहदी यांनीही असेच पाऊल उचलले. नसरल्लाहच्या हत्येचे वृत्त समोर येताच, मेहदीने लगेचच निवडणूक प्रचार थांबवल्याची घोषणा केली. अशाप्रकारे मुस्लिमांना वेगळे पाडून, त्यांच्या मनात कट्टरतावाद वाढवून, आपला राजकीय फायदा करण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज असतातच. महाराष्ट्रातही दहशतवादी इशरत जहाचे समर्थक आ. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याप्रमाणेच दहशतवादी ओसामा बिन लादेनचे चरित्र वाचण्याचा सल्ला दिला होता. त्याचप्रमाणे लादेन हा समाजामुळे दहशतवादी बनला, अशी अतिशय बालिश मांडणीदेखील त्यांनी केली होती.
अशा परिस्थितीमध्ये मुस्लिमांनी कोणी त्यांची निष्ठा विचारल्यास, त्याचा राग येण्याचे कारण नाही. कारण, एकीकडे भारतात राहायचे, भारत सरकारच्या सर्व सोयीसुविधा घ्यायच्या, अन्य मुस्लीम राष्ट्रांपेक्षाही चांगल्या सामाजिक - राजकीय - आर्थिक वातावरणात राहायचे, राजकीय प्रतिनिधित्वही प्राप्त करायचे, आणि आपल्या निष्ठा केवळ इस्लामपाशीच असल्याची भूमिका घ्यायची, हा दुटप्पी प्रकार भारतीय मुस्लीम फार काळ सुरू ठेवू शकत नसल्याचे भान त्यांनी ठेवायला हवे.