शिमलात अवैध जामा मशीद पाडण्यास हिंदूंची मागणी

    02-Oct-2024
Total Views | 47

Illegle Jama Masjid
 
शिमला : जामा या अवैध मशिदीविरोधात (Illegle Jama Masjid) शिमला येथील हिंदूंनी आवाज उढवला आहे. ही मशीद बेकायदेशीर ठरवत संघटनांनी मोर्चेबांधणी केली आहे. येथे बांधलेली जामा मशीग पाडण्याची मागणी केली आहे. हिंदू संघटनेच्या सदस्यांची पोलिसांशी यावेळी धरपकड झाली होती. हे प्रकरण ३० सप्टेंबर रोजीचे आहे. यावेळी हिंदूंनी या निषेधार्थ मोर्च्याचे प्रदर्शन केले होते.
 
प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, जी मशीद अवैध आहे असा दावा हिंदूंनी केला ती मशीद ही कुल्लू येथील आखाडा बाजारा येथे आहे. या मशिदीला प्रशासनाने वैध असल्याचे सांगितले आहे. मात्र हिंदूंना ही मशीद अवैध असल्याचा दावा केला आहे. त्यावेळी त्यांनी हे बांधका हे बेकायदेशीर असल्याचे सांगत ३ किमीपर्यंत भव्य प्रदर्शन करत धर्म जागरण यात्रा असे नाव दिले आहे.
 
त्यावेळी मोर्चा हा मशिदीकडे जाऊ लागला होता. त्यावेळी आंदोलन चिघळण्याची शक्यता होती. यावेळी पोलिसांनी या आंदोलनाची दखल घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मशिदीजवल कोणते वाईट कृत्य होऊ नये यासाठी पोलिसांनी भारतीय न्यासंहिता कलम १३६ लागू केले होते.
 
 
 
यावेळी पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आणि कायदेशीरपणे आपले मत मांडण्याचे आवाहन केले. प्रशानाच्या प्रयत्नांमुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या कोणालाही मशिदीजवळ आता आले नाही, काही वेळाने मिरवणूक पढे सरकाली मशिदीपासून सुमारे २५ मीटर अंतरावर हनुमान चालिसाचे पठण सुरू केले.
 
विश्व हिंदू परिषद या मशिदीसाठी गेल्या २१ जून २०१७ रोजी मशिदीला बेकायदेशीर ठरवत मशिदीबाबत कुल्लू नगरपरिषदेकडे तक्कार केली होती. या तक्रारीची दाखल घेत नगरपरिषदेने २८ जून नोटीस बजावली होती. त्यानंतर आता बांधकाम बंद करण्यात आले होते. जामा मशीद म्हणून ओळखली जाणार ही वास्तू आहे २००० रोजी मंजूर झाली आहे. त्यानंतर इतर मजल्यांचे बांधकाम हे २००० सालानंतर बांधण्यात आले होते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121