आखाती देशांमध्ये पीएफआयचे हजारो सदस्य - ईडी

    19-Oct-2024
Total Views | 40

pfi

नवी दिल्ली : ( PFI ) भारतातील प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरुद्ध ईडीच्या दोन वर्षांच्या तपासात नवे खुलासे समोर आले आहेत. पीएफआयचे सिंगापूर आणि आखाती देशांमध्ये १३ हजारांहून अधिक सक्रिय सदस्य आहेत, ज्यांच्याकडे करोडो रुपयांचा निधी उभारण्याची जबाबदारी असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
 
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयने आखाती देशांमध्ये राहणाऱ्या प्रवासी मुस्लिम समुदायासाठी जिल्हा कार्यकारी समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांना निधी उभारणीची जबाबदारी देण्यात आली होती. ईडीने म्हटले आहे की परदेशातून जमा केलेला करोडो रुपयांचा निधी वेगवेगळ्या बँकिंग चॅनेलद्वारे तसेच हवालाद्वारे भारतात पाठविला गेला होता, जेणेकरून या निधीचा शोध घेता आला नाही. या निधीचा वापर पीएफआयचे अधिकारी आणि दहशतवादी घटना घडवण्यासाठी भारतात बसलेल्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात आला.
 
सप्टेंबर २०२२ मध्ये एनआयए आणि ईडीने देशभरातील पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये पीएफआयशी संबंधित अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर युएपीएअंतर्गत कारवाई करण्यात आली. छापेमारीनंतर केंद्र सरकारने २८ सप्टेंबर २०२२ रोजी पीएफआय संस्थेवर बंदी घातली होती. तेव्हापासून ईडी पीएफआयविरोधात चौकशी करत आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121