किवींना विजयासाठी १०७ धावांचे आव्हान; शेवटच्या दिवशी फलंदाजी करणे कठीण होणार?
19-Oct-2024
Total Views | 61
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघाने टीम इंडियावर आघाडी घेतली असून १०७ धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपला होता. त्यानंतर न्यूझीलंडने ४०२ धावा करत ३५६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. सर्फराजने या सामन्यात आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले शतक झळकावले.
दरम्यान, ३५६ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना टीम इंडियाने ४६२ धावा केल्या आहेत. सर्फराज खान १५० धावा तर रिषभ पंतचे शतक अवघ्या १ धावामुळे हुकले. ऐतिहासिक शतकाला हुलकावणी देतानाच टीम इंडियाचा दुसरा डावात ४६२ धावा करत १०६ धावांची आघडी घेतली. न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या डावात विराट कोहली आणि सर्फराज खान यांच्यात १३६ धावांची बहुमोल भागीदारी झाली.
न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मॅट हेन्री, ओर्रुक यांनी प्रत्येकी ३- ३ विकेट्स घेतल्या. तर एजाज पटेलने २ विकेट्स, फिलिप्सने १ विकेट घेतली. टीम इंडियाने दुसऱ्या डावात उत्तम कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. रिषभ पंत आणि सर्फराज खान यांच्यात चौथ्या विकेटसाठी १७७ धावांची भागीदारी झाली. त्याचा फायदा टीम इंडियाला आघाडी घेण्यास फायदेशीर ठरली.