आर्किटेक्चर आणि बांधकाम प्रकल्प हे दोन स्वतंत्र व्यवसाय आहेत. जगभरात विविध बिल्डिंग आणि डिझाईन ट्रेंड येतात आणि जातात. त्यापैकीच डिजिटल तंत्रज्ञान हे आजकाल, बांधकाम प्रक्रियेचा आमूलाग्र एक भाग आहे. आजच्या लेखातून जगभरात डिजिटल चिन्हे, संकेत वापरण्याकडे वाढत असलेल्या कलाचे महत्त्व जाणून घेऊया. २०२२ साली, जागतिक डिजिटल साइनेज मार्केटचे मूल्य २४.८६ अब्ज डॉलर्स इतके होते. हे मूल्य २०३० सालापर्यंत अंदाजे आठ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीच्या अंदाजानुसार ४० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. जसजसे नवीन तंत्रज्ञान उदयास येतेय, तसतसा डिजिटल साइनेज उद्योगाच्या बाजारपेठेचा आलेख उंचावत आहे.
बांधकाम प्रकल्पांसाठी डिजिटल संकेत चिन्हे म्हणजे काय? हे समजून घेतले पाहिजे. या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे , कोणतेही डिजिटल चिन्ह, जे आज बांधकाम प्रकल्पाच्या आर्किटेक्चरचा भाग झाले आहे. एखादी इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या इमारतीचे सौंदर्य कायम राखत, दर्शनी भाग डिजिटल फलकांनी सजविला जातो. आज अधिकाधिक नवीन बिल्ड, डिजिटल साइनेज या प्रक्रियेत तयार करण्यात येत आहेत. डिजिटल साइनेज बांधकाम प्रक्रियेचा एक अखंड भाग होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मोठ्या इमारतींच्या बाहेरील बाजूला लावण्यात आलेले होर्डिंग, घरातील आणि बाहेरील भव्य व्हिडिओ भिंती, मोठ्या इमारतींमध्ये किंवा मजल्यावरील दिशादर्शक फलक, संग्रहालयात सादर होणारी प्रदर्शने आणि परस्परसंवादी कलाकृती, ही आजच्या काळातील प्रचलित डिजिटल चिन्हे किंवा संकेत यांची उदाहरणे म्हणता येतील. डिजिटल नेटिव्ह म्हणून, तरुणाई मॉल आणि स्टोअरमध्ये जाऊन खरेदीला प्राधान्य देतात. अशावेळी रिटेल स्टोअरमध्ये लावलेल्या डिस्प्ले तंत्रज्ञानामध्ये, ग्राहकांची गुंतवणूक होण्याची शक्यता अधिक असते. तर किरकोळ क्षेत्रातील ब्रॅन्ड्ससाठी स्टोअरमधील डिजिटल सायनेज प्रभावी ठरू शकतो.
डिजिटल साइनेजचा जागतिक पातळीवरील वापर स्थिर आहे. तथापि, युरोप आणि आशिया-पॅसिफिकसारख्या अनेक बाजारपेठांनी, उत्तर अमेरिकन बाजारपेठेशी संपर्क साधल्यामुळे, येत्या काही वर्षांमध्ये डिजिटल साइनेज अधिक विस्तारण्यास सज्ज आहे. अशावेळी उत्तर अमेरिकेत वापर वाढत राहण्याची अपेक्षा असताना, युरोप, आशिया पॅसिफिक आणि अधिक विकसनशील देशांनीही या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करणे अपेक्षित आहे. १७.१३ टक्क्यांच्या वार्षिक वाढीच्या दराने डिजिटल साइनेज मार्केटचा अंदाज घेऊन, युरोपची बाजारपेठ वेगाने वाढते आहे. तथापि, आफ्रिका आणि मध्य पूर्वमधील या क्षेत्रातील दिग्गज खेळाडूंनी, सुमारे ११.२९ टक्के वाढीची अपेक्षा केली आहे. कोविडनंतर व्हिडिओ भिंतीचा वापर वाढल्याने, व्हिडिओ भिंती डिजिटल साइनेज मार्केटमधील सर्वात मोठ्या वाढीच्या क्षेत्र झाल्या आहेत. या व्हिडिओ वॉल बाजारपेठांच्या वाढीसाठी योगदान देणारा प्रमुख घटक आहेत. हॉस्पिटॅलिटी ते कॉर्पोरेट जगतापर्यंत जागतिक डिजिटल साइनेज बाजारपेठ वेगाने वाढत आहे. इन-स्टोअर डिजिटल पोस्टर्सपासून, इव्हेंटसाठी व्हिडिओ भिंतीपर्यंत किंवा ऑफिसमध्ये लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणून डिजिटल साईनेजचे महत्त्व वाढते आहे.
ही डिजिटल चिन्हे हा सामान्य लोकांशी संवाद साधण्याचा एक प्रमुख मार्ग आहे. विशेषत: विपणन धोरणाचा भाग म्हणून, तसेच महत्वाच्या, तातडीच्या सूचना प्रसारित करण्यासाठी इमारतीच्या आत आणि बाहेर वापरले जाऊ शकतात. डिजिटल चिन्हे अंतर्गत संवादासाठीही वापरली जाऊ शकतात. जसे की कर्मचार्यांना घोषणा करण्यासाठी किंवा प्रशिक्षण हेतूंसाठी यांचा वापर होतो. बिल्डिंग प्रोजेक्ट प्लॅनमध्ये डिजिटल साइनेज समाविष्ट करण्याचे भरपूर फायदे आहेत. मात्र, या डिजिटल चिन्हे आणि फलकांची नियमित देखभाल, वेळोवेळी अद्यतने आणि दुरुस्तीची आवश्यकता भासू शकते. इतकेच नाहीतर त्यांना, भविष्यात कधीतरी बदलण्याची गरज निर्माण होऊ शकते. जगभरातील व्यवसाय आणि ब्रॅन्ड त्यांच्या इमारतींमध्ये डिजिटल साइनेज जोडणे, हा एक ट्रेंड मानत आहेत. यातूनच असे लक्षात येते की, आधुनिक आर्किटेक्चरवर आणि जगभरातील नवीन बांधकाम प्रकल्पांमध्ये, डिजिटल साइनेजचा वापर होण्याची शक्यताचा अधिक आहे. तंत्रज्ञानात बदल होत असताना, डिजिटल साइनेज आणखी फायदेशीर बनवण्यासाठी ते सातत्याने अपग्रेड केले जाऊ शकतात.