भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत संत संमेलन
18-Oct-2024
Total Views | 38
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत संत संमेलन पार पडले. मुंबईतील प्रमुख धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांसोबत नड्डा यांनी संवाद साधला.
विलेपार्ले पूर्व येथील पाटीदार सभागृहात आयोजित या संत संमेलनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी तथा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सन्यास आश्रम देवस्थानचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी यांच्यासह मुंबईतील प्रमुख धार्मिक संस्थांचे विश्वस्त उपस्थित होते. 'दै. मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण रवींद्र शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.