मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला. परंतू, त्यांच्या पक्षप्रवेशाने शरद पवार गटाचे नेते प्रविण माने नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे आता ते अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटातीन प्रविण माने, आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शाह हे नेते नाराज आहेत. दरम्यान, हे नेते पक्षात बंडखोरी करण्याचीही चर्चा रंगली होती. त्यानंतर आता प्रविण माने इंदापूर विधानसभा निवडणूकीत अपक्ष लढणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच प्रविण माने आणि आप्पासाहेब जगदाळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात असल्याचीही माहिती सुत्रांकडून पुढे आली आहे. त्यामुळे आता शरद पवारांची खेळी त्यांच्यावरच उलटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.