काँग्रेसकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर!
17-Oct-2024
Total Views | 121
नांदेड : नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसने नुकताच आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली आहे. दरम्यान, त्यांच्या विरोधात कोण उभं राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले होते. परंतू, काही दिवसांतच त्यांचे निधन झाले. तेव्हापासून नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची तारीख जाहीर केली.
येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडेल. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, याचवेळी नांदेड लोकसभा पोटनिवडणूकसुद्धा होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने नुकतीच वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.