ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

    16-Oct-2024
Total Views | 37

vijay  
 
 
मुंबई : नाटक, मालिका आणि चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विजय गोखले यांनी आजवर मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही महत्वपुर्ण भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, गंधार पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी दिली. तसेच, २०२३पासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार स्पृहा दळी हिला देण्यात येणार आहे.
 
गंधार पुरस्कार जाहिर झाल्यानंतर 'दै. मुंबई तरुण भारत'शी आपल्या भावना व्यक्त करताना विजय गोखले म्हणाले की, “गंधार सारख्या नामांकित संस्थेच्यावतीने हा पुरस्कार मला जाहिर होणं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. इतकी वर्ष मनोरंजनसृष्टीत काम केल्याची ही पोचपावती आहे. शिवाय एका छराविक नाटकाचा नाही तर एखाद्या व्यक्तिच्या कारकिर्दिची गंधार ही संस्था दखल घेते याबद्दल विशेष कौतुक आहे. आणि मला यंदाचा गंधार पुरस्कार जाहिर केल्याबद्दल मी संस्थेचा आभारी आहे”.
 
गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जात असून यंदा या पुरस्काराचे हे नववे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांना आतापर्यंत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचे मानकरी विजय गोखले यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते गोखले यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
मी नुसता एसंशी नाही तर...; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उबाठा गटाला सडेतोड उत्तर

"मी नुसता एसंशी नाही तर..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उबाठा गटाला सडेतोड उत्तर

मला 'एसंशि' नाव दिले आहे मात्र मी नुसता 'एसंशि' नसून महाराष्ट्रासाठी ‘एसंशियल’ म्हणजे 'गरजे'चा आहे, असे सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला दिले. विधानसभा निवडणुकीत कोकणवासीयांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्याबाबत आभार व्यक्त करण्यासाठी गुरुवार, २४ एप्रिल रोजी कुडाळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते...

माझ्यासाठी नेहमीच राष्ट्रपथम!; अर्शद नदीमला भारतात बोलावण्यावरुन ट्रोल झालेल्या नीरज चोप्राची भावनिक पोस्ट

"माझ्यासाठी नेहमीच राष्ट्रपथम!"; अर्शद नदीमला भारतात बोलावण्यावरुन ट्रोल झालेल्या नीरज चोप्राची भावनिक पोस्ट

(Neeraj Chopra)भालाफेक स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारा भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला आगामी काळात भारतात आयोजित केलेल्या एनसी क्लासिक स्पर्धेसाठी आमंत्रित केले होते. यावरुन नीरजवर जोरदार टीका होत होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान नीरजच्या निमंत्रणाची बातमी समोर आल्यानंतर नीरजवर समाजमाध्यमांमधून टीकेची राळ उठली होती. या प्रकरणावर आता नीरजने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्याच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत समाजमाध्यमावर..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121