गती आणि प्रगती म्हणजे महायुती : चंद्रशेखर बावनकुळे

    16-Oct-2024
Total Views | 49
 
chandrashekhar bawankule
 
मुंबई : (Mahayuti Sarkar) महाराष्ट्र राज्यात बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाकडून विधानसभा निवडणुक २०२४ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू झाली असून जागावाटपासंबंधी पक्षांमध्ये अंतर्गत हालचाली सुरू झालेल्या दिसत आहेत. अशातच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकांउटवर "गती आणि प्रगती म्हणजे महायुती" असे म्हणत महायुती सरकारचे कौतुक करत पोस्ट केली आहे.
 
महायुतीतील सर्व पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सादर करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्डबाबत या पोस्टमध्ये बावनकुळेंनी "राजकारण हे जनसेवेचे साधन आहे हे मानून सातत्याने लोकहिताचे, जनकल्याणाचे निर्णय घेणारे आमचे महायुती सरकार आहे. सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या, ज्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून सरकारने निर्णय घेतले. जनतेसमोर केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड मांडणारे हे महायुतीचे प्रामाणिक सरकार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो", असे म्हटले आहे.
 
या पोस्टमध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला आहे. तसेच "महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या व नेत्यांच्या कसल्याही भूलथापांना बळी न पडता महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या या रिपोर्ट कार्डचा गांभीर्याने विचार करून महायुतीचेच सरकार पुन्हा निवडून आणेल हा मला विश्वास आहे", असेही ते म्हणाले आहेत.
   
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121