नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जॉलीग्रांट रूग्णालयात गेले. त्यावेळी त्यांनी आपली आई सावत्री देवी यांची मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सावित्री देवींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रूग्णालयात दाखल होतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांच्या दौऱ्यादरम्यान उत्तराखंडचे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून यावेळी रूग्णालयातही कडक बंदोबस्त राखण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, आदित्यनाथ योगी यांची आई सावित्री देवी उत्तराखंड येथील यमकेश्वर येथील पंचूर गावा ठिकाणी योगी आदित्यनाथ यांच्या बहिणीसोबत राहत होते. जून २०२४ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईची तब्येत बिघडली होती. त्यावेळी भारतीय आयुर्विज्ञान संस्थान येथे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री योगी यांना आपल्या आईला भेचता आले नव्हते.