अमरावती : माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले आहे. हैदराबादमधील एका व्यक्तीने हे पत्र पाठवले असून यात नवनीत राणांना सामूहिक अत्याचाराची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, नवनीत राणांच्या स्वीय सहायकाने यासंबंधी राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
नवनीत राणांना आलेल्या पत्रातून १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली असून खंडणी न दिल्यास सामूहिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात आली आहे. अमीर नावाच्या एका व्यक्तीने हैदराबादवरून नवनीत राणांच्या घरी शुक्रवारी हे पत्र पाठवले. या पत्रात नवनीत राणांच्या घरासमोर गाय कापण्याचीही धमकी देण्यात आली आहे. तसेच या पत्रात नवनीत राणा आणि रवी राणांबद्दल वादग्रस्त विधान करण्यात आले आहे.