नवरात्रौत्सवात दुर्गामातेच्या मूर्तीवर दगडफेक

    11-Oct-2024
Total Views | 77

Navratri Festival
 
हैदराबाद : गणेशोत्सवानंतर आता दुर्गामातेच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना हैदराबाद येथील नामपल्ली मैदानावर घडली. यामुळे आता हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. शारदीय नवरात्रौत्सवादरम्यान स्थापन करण्यात आलेल्या दुर्गामातेच्या मूर्तीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. ही घटना १० ऑक्टोबर २०२४ रोजी घडली आहे.
 
याप्रकरणीत आता मिळालेल्या माहितीनुसार, नामपल्ली येथील एका मैदानावर घडलेल्या घटनेनंतर बेगम बाजार पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याच रात्री दांडिया आणि गरबा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडेपर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे स्थानिक रहिवासी आणि भाविकांमध्ये सुरक्षेची चिंता वाढली आहे.
 
यावेळी पोलिसांनी प्रसारमाध्यमाशी बोलत असताना सांगितले की, काही अज्ञातांनी नामपल्ली मैदानावर दुर्गा पूजास्थळी छेडछाड केली असून दुर्गामुर्तीची विटंबना झाली. यावेळी आयोजकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले गेले. 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..