नवी मुंबई : सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात सर्वात पुढे गेला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवारी, नवी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टचे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हे देशातील सर्वात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर आहे. देशातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान इथे एकत्रित करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारचे सायबर अटॅक आणि फसवणूक यामाध्यमातून थांबवता येतील आणि अपराधींना शिक्षा देता येईल. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र सायबर सिक्युरिटीमध्ये देशात सर्वात पुढे गेला आहे. कुठल्याही प्रकारचे सायबर गुन्हे थांबवण्यासाठी या सेंटरचा फायदा होणार आहे."
"यावेळी १४४०७ हा एक नंबरसुद्धा लॉन्च करण्यात आला आहे. या नंबरद्वारे सायबर गुन्हेगारी संदर्भात एखाद्या व्यक्तीला सगळी मदत करता येणार आहे. हा नंबर सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांकरिता एक उपाय म्हणून पुढे येत आहे," असेही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.