‘उम्मा’ची उपयोगशून्यता

    01-Oct-2024   
Total Views | 45
challenges of muslim ummah stress unity religious harmony


मुस्लीम देशांमधील कथित एकतेची, बंधुभावाची संकल्पना म्हणजे ‘उम्मा.’ अर्थोअर्थी जगातील ५७ मुस्लीमबहुल देश हे ‘उम्मा’च्या छत्रछायेखाली येतात. मग त्यात सुन्नी-वहाबी सौदी अरेबिया आला, शियाबहुल इराणही आला, एर्दोगानचा तुर्कीही आला आणि आपला शेजारी पाकिस्तानीही. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या, मुस्लीम रितीरिवाज आणि परंपरांच्या बाबतीतही विखुरलेले असले तरी हे सगळेच देश ‘उम्मा’च्या अदृश्य उबेखाली स्वत:ला सुरक्षित मानतात.

पण, त्यांचे असे मानणे हाच मुळी एक मोठा भ्रम. आणि विशेष म्हणजे, आपण या ‘उम्मा’ नामक भ्रामक संकल्पनेत जगत आहोत, याची या सर्व राष्ट्रांना, त्यांच्या राष्ट्रप्रमुखांनाही पुरेपूर कल्पना आहेच. पण, तरीही उगाच धार्मिक भावनेपोटी ‘उम्मा’च्या एकीचा आव अधूनमधून आणला जातो. कुठल्याही प्रकरणी भूमिका घेताना ‘उम्मा’ म्हणून विचार न करता, ती भूमिका आपल्या राष्ट्रहितासाठी किती अनुकूल, किती प्रतिकूल यालाच साहजिकच प्राधान्य दिले जाते. म्हणजे काय तर, प्रत्येक मुस्लीम देशासाठी इस्लामपेक्षा, ‘उम्मा’पेक्षा त्यांचाच देश, त्यांची ध्येय-धोरणे महत्त्वाची. शेजारी देश असलेल्या पाकिस्तानचेच उदाहरण घेऊ. वर्षानुवर्षे चीनमधील उघूर मुसलमानांवर तेथील कम्युनिस्ट सरकारतर्फे नरसंहाराची क्रूर मालिका सुरुच आहे.

पण, चीनच्या दयाभीकेवर तुकडे तोडणार्‍या पाकिस्तानला मात्र उघूर मुस्लिमांविषयी ‘उम्मा’चा भाग म्हणून यत्किंचितही सहानुभूती वाटते का? हाच प्रश्न पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनाही एका परदेशी माध्यम समूहाने मुलाखतीत विचारला असता, खान यांनी सारवासारव करीत, तो चीनचा अंतर्गत मुद्दा असून, हे पाश्चात्त्यांनी चीनविरोधात रचलेले षड्यंत्र असल्याचे सांगत, उघूरांच्या नरसंहाराची दाहकताच अमान्य केली होती. पण, केवळ पाकिस्तानच नाही, तर सगळेच मुस्लीमबहुल देश अशाच प्रकारे सोयीस्कररित्या ‘उम्मा’ला बिलगताना आणि याच ‘उम्मा’ला झुगारतानाही दिसतात. सध्याच्या इस्रायल विरुद्ध ‘हमास’, ‘हिजबुल्ला’विरोधी युद्धातही त्याची प्रचिती यावी. “मी व्यक्तिश: पॅलेस्टाईन प्रकरणाला फारसे प्राधान्य देत नाही, पण सौदीच्या नागरिकांच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा आहे,” असे विधान सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अ‍ॅन्थोनी ब्लिंकन यांच्याशी जानेवारी महिन्यात बोलताना केल्याचे उघडकीस आले होते.

पण, दुसरीकडे त्याच सौदीने आता इस्रायलसह स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या भूमिकेसाठी जागतिक देशांची आघाडी स्थापन करण्यासाठी पाऊले उचलणार असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेपूर्वी जाहीर केले. पण, मुळात सौदीच्या पंतप्रधानांच्या खिसगणतीतच पॅलस्टाईनचे प्रकरण नाही, तर या सौदीप्रणीत संभाव्य जागतिक आघाडीचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. म्हणजे, केवळ ‘उम्मा’ची औपचारिकता म्हणून पॅलेस्टाईनच्या भविष्याची तोंडदेखली चिंता व्यक्त करायची आणि वास्तवात त्या प्रकरणी ‘नरोवा कुंजरोवा’ अशी भूमिका घ्यायची, असा हा सगळा दुटप्पीपणा!

पश्चिम आशियातील युद्धभूमीवरही ‘उम्मा’च्या कथित एकीच्या बळाची अशीच धूळधाण उडालेली दिसते. गाझामध्ये ‘हमास’चे कंबरडे मोडल्यानंतर लेबेनॉनमध्ये ‘हिजबुल्ला’च्या म्होरक्याला इस्रायलने ठार केले. एवढेच नाही, तर लेबेनॉन सीमेवरील ‘हिजुबल्ला’चे दहशतवादी तळ ध्वस्त करण्यासाठीही इस्रायल सैनिकांनी सीमोल्लंघन केले आहे. पण, त्यानंतरही एरव्ही इस्रायलविरोधात युद्धाची वल्गना करणार्‍या इराणने ‘उम्मा’च्या बचावार्थ भूमिका घेतली नाही. उलट इस्रायलविरोधात लढण्यासाठी लेबेनॉन किंवा गाझामध्ये सैन्य तैनात करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका इराणने जाहीर केली.

‘हिजबुल्ला’च्या म्होरक्याच्या हत्येनंतर आधीच इराणचे सर्वेसर्वा खोमेनी जीवाच्या भीतीपोटी अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे इस्रायलच्या विरोधात कोणत्याही प्रकारची आगळीक ही परवडणारी नाही, याची पुरेपूर कल्पना इराणला आहे. तसेच इस्रायलवरील हल्ल्यासाठी आपल्या देशाची हवाई हद्द कुणालाही वापरु देणार नसल्याची तंबीही सौदीने दिल्याने, इराणनेही आपली तलवार म्यान केली. म्हणजेच, ‘उम्मा’ आणि ‘ओआयसी’चे खरोखरच जमिनी अस्तित्व असते, तर हेच ५७ मुस्लीम देश इस्रायलविरोधात ‘जिहाद’साठी एकदिलाने एकवटले असतेच की. पण, तशी दुरान्वये शक्यता नाही. एकूणच पश्चिम आशियातील ही उलथापालथ ‘उम्मा’ची उपयोगशून्यतेवर शिक्कामोर्तब करणारी!
 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण कहाणी! ऑपरेशन कसे पार पडले? – वाचा सविस्तर

ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण कहाणी! ऑपरेशन कसे पार पडले? – वाचा सविस्तर

दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते...

Operation Sindoor : २६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतलेले तळही उद्ध्वस्त, केवळ २५ मिनिटांत ९ ठिकाणांवर कशी केली कारवाई? कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

Operation Sindoor : २६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतलेले तळही उद्ध्वस्त, केवळ २५ मिनिटांत ९ ठिकाणांवर कशी केली कारवाई? कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

(Operation Sindoor) जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. या दहशतवादी तळांवर आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडली यांना प्रशिक्षण दिलेले तळही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121