ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड!

    09-Jan-2024
Total Views | 136

Ravindra Waikar


मुंबई :
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. जोगेश्वरी येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी ही धाड पडली आहे. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि इतर चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. याशिवाय रवींद्र वायकर यांच्या भागीदारांच्या घरावरही धाड पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मंगळवारी सकाळपासूनच ईडीचे अधिकारी रवींद्र वायकर यांच्या घरी दाखल झाले असून तेथील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता त्यांच्या घरी ईडीची धाड पडली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
 
रवींद्र वायकर यांच्यावर कोणते आरोप?
 
जुलै २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोगेश्वरी येथे लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर २ लाख स्केवअर फुटाचे ५०० कोटी रुपयांचे ५ स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी रवींद्र वायकर यांना दिली होती. दरम्यान मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बॅक्वेटच्या नावाने हा शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप वायकर यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
दहशतवाद्यांनी कधी कल्पनाही केली नसेल त्याहून कठोर शिक्षा देणार!; बिहारमधील भाषणातून पंतप्रधान मोदींचा थेट इशारा

"दहशतवाद्यांनी कधी कल्पनाही केली नसेल त्याहून कठोर शिक्षा देणार!"; बिहारमधील भाषणातून पंतप्रधान मोदींचा थेट इशारा

(PM Narendra Modi Assures Response To Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. केंद्र सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार धरत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली असतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना "दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना आणि त्यांच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीक..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121