मुंबई : मुंबईतील शिक्षकांचे लेसन प्लॅन कुणी बंद केले-अनिल बोरनारे, शाळा सुटल्यावर विनाकारण शिक्षकांना थांबवून ठेवणे कुणी बंद केले- अनिल बोरनारे, शासकीय कर्मचाऱ्यांसोबत सातवा वेतन आयोग कुणी मिळवून दिला. अनिल बोरनारे, अनेक महिला शिक्षकांना नाकारलेल्या बाल संगोपन रजा कुणी मिळवून दिल्या ? अनिल बोरनारे पे फिकसेशन स्टॅम्पिंग मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना धडा कुणी शिकविला- अनिल बोरनारे अशा अनेक कामांबद्दल शिक्षकांनीच शिक्षकांना सांगितले.
बोरिवली येथील मेरी ईमॅक्यूलेट गर्ल्स हायस्कूल व ज्यु कॉलेज मध्ये सुरू असलेल्या पश्चिम विभागातील शाळांमधील शिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन अनिल बोरनारे यांनी शिक्षकांशी संवाद साधून शिक्षकांना त्यांच्या कार्यावरील आधारित कॅलेंडरचे वाटप केले. शिक्षकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच असून शिक्षकांचे प्रतिनिधी विधिमंडळात प्रभावीपणे काम करीत नसल्याने समस्यांमधील गुंता सुटण्याऐवजी वाढत असल्याचे बोरनारे यांनी सांगून आपल्याला पक्षाने संधी दिली तर मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविणार असून बहुमताने निवडून येऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला