मुंबई : ९० टक्के हिंदू लोकसंख्या असलेल्या देशातील सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर आहे. लॅण्ड जिहाद, लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदूंची लोकसंख्या कमी करून, २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे षड्यंत्र त्यामागे आहे. त्यामुळे हिंदूंच्या जमिनीवर अतिक्रमण करणारा वक्फ बोर्ड कायदा रद्द करा, अशी आग्रही मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी शनिवार, दि. ६ जानेवारी रोजी सोलापूर येथे केली.
सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी सोलापूर येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आयोजित केलेल्या भव्य सभेत राणे बोलत होते. यावेळी तेलंगणचे भाजप आमदार टी. राजा, ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. सभेला संबोधित करताना राणे म्हणाले, भारत हिंदुराष्ट्र कधी बनणार, असा प्रश्न अनेकजण विचारतात. त्यांना मी सांगू इच्छितो, माझा भारत हिंदुराष्ट्रच आहे. भारतातील प्रत्येक इंच जमीन हिंदूंचीच आहे. या हिंदूराष्ट्रात हिंदू समाजाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल, तर ती नजर आम्ही जागेवर ठेवणार नाही. देशभरातील हिंदू एकत्र येऊन रस्त्यावर उतरले, तर या दाढी कुरवाळणाऱ्यांना क्षणार्धात चिरडून टाकतील. त्यामुळे या हिरव्या सापांना एकच सांगेन, आमच्या नादी लागू नका. यापुढे हिंदू समाजावर अन्याय कराल, तर याद राखा, असा इशाराही राणे यांनी दिली.
भारतीय लष्कर आणि रेल्वेनंतर ‘वक्फ बोर्डा’कडे सर्वाधिक जमीन आहे. म्हणजेच ‘वक्फ बोर्ड’ हे देशातील तिसरे मोठे जमीन मालक आहे. ९० टक्के हिंदूंच्या देशात यांच्याकडे इतक्या जमिनी आल्या कशा? १९९५ साली तत्कालीन सरकारने कायद्यात सुधारणा करून ‘वक्फ बोर्डा’ला अमर्याद अधिकार दिले. त्या जोरावर यांनी जमिनी बळकावल्या. असा कायदा फक्त आपल्या देशात आहे. इस्लाम मानणाऱ्या एकाही देशात किंबहुना पाकिस्तानातही वफ्क कायदा नाही. ज्या देशांत ९० टक्के हिंदू राहतात, तेथे असा कायदा करून हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याचे षड्यंत्र यामागे आहे. लॅण्ड जिहाद, लव्ह जिहादच्या माध्यमातून यांना भारताला इस्लामिक राष्ट्रबनवायचे आहे. दिवसरात्र त्यासाठी मेहनत घेतली जात आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाचा कायदा आम्हाला मान्य नाही, तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
हिंदू बांधवांनो पेटून उठा
या वक्फ बोर्डात एकही हिंदू नाही, सगळे मुस्लीम. या लोकांना कुठलीही जमीन घ्यायची असेल, तर आपल्याला विचारणारही नाहीत. अतिक्रमण घोषित करणार आणि मग त्यांचे अधिकारी येऊन दमदाटी करणार. याविरोधात एकत्र लढा देण्याची गरज आहे. जेथे जेथे वक्फ बोर्डाची माणसे जमीन मागायला येतील, तेथे हिंदूंनी एकत्र येऊन आवाज उचलायला हवा. महाराष्ट्र, केंद्र सरकार पूर्णपणे तुमच्या पाठिशी आहे. केंद्रात आणि राज्यात हिंदुत्त्ववादी सरकार आहे. मुख्यमंत्री कडवट विचारांचे आहेत. बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले आहेत. कोणी अंगावर आले, तर ते शिंगावर घेतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडवट हिंदुत्त्ववादी आहेत. कालचा कोल्हापूरचा कार्यक्रम (पावनगड अतिक्रमण) बघा. हे लोक झोपेतून जागे होईपर्यंत मदरसा साफ. त्यामुळे वक्फविरोधात आवाज उठवण्यासाठी राजा सिंह किंवा नितेश राणेला यायची गरज नाही. हिंदू बांधवांनो पेटून उठा, असे आवाहन राणे यांनी केले.
'त्यांचा अली, तर आमचा बजरंगबली'
अधिकृत गोष्टींना आमचा विरोध नाही. पण, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेवर येणार आहेत. या देशात भगवाधाऱ्यांचेच राज्य राहणार आहे. त्यामुळे यांचे अत्याचार सहन करू नका. 'त्यांचा अली, तर आमचा बजरंगबली', ही घोषणा लक्षात ठेवा. यापुढे सरकारी अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवले नाही, तर त्या धार्मिक अतिक्रमणाच्या जवळपास बजरंगबलीची मूर्ती बसवा. मग त्या शहाण्या अधिकाऱ्याला सांगा, तुझ्यात हिंम्मत असेल, तर आधी ते अतिक्रमण तोड. तुम्ही सरकारी नोकर आहात की जिहाद्यांचे, असा सवाल विचारा, असेही राणे म्हणाले.
शरीया कायदा लागू करण्याचे प्रयत्न
सिरीया आणि पाकिस्तानसारखा शरीया कायदा हिंदुस्थानात लागू करण्याचे यांचे प्रयत्न आहेत. ठाण्यात अलिकडे एनआयएने कारवाई केली. पडघा गावासह आजूबाजूच्या पाच गावांत लॅण्ड जिहाद करून यांनी हिंदूंना पळवून लावले. १०० टक्के जिहादी लोक तिथे रहायला लागले. गावाचे नाव बदलून अल-शाम ठेवले. तुमचे डोळे योग्य वेळे उघडले नाहीत, तर सोलापूरचे नाव सलामपूर ठेवतील. त्यामुळे जागे व्हा, असे आवाहनही राणे यांनी केले.
...तर हिंदुस्थानचे इस्लामिक राष्ट्र होईल - टी. राजा
महाराष्ट्राच्या पवित्र धर्तीवर ज्याप्रकारे लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, गोहत्या, वक्फ बोर्डाचा अत्याचार वाढत चालला आहे, त्याला रोखण्यासाठी हिंदूंची एकजूट होण्याची गरज. या आक्रोश मोर्चाचा एकमेव उद्देश आहे, झोपी गेलेल्या हिंदूंना जागे करणे. कारण, जातीयवादात हिंदू समाज विभाजित होऊ लागला आहे. त्याचा फायदा हे लोक घेऊ लागले आहेत. त्यामुळे यापुढे कोणी तुम्हाला विचारेल, तुमची जात कुठली, तर त्याला ताठ मानेने सांगा माझी जात हिंदू आहे, असे आवाहन भाजपचे तेलंगणचे खासदार टी. राजा यांनी सांगितले. सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिराच्या जागेवर वक्फ वाल्यांनी दावा सांगितला आहे. ही जागा तुमच्या बापाने वरून आणली आहे का? नेहरूंमुळे फोफावलेल्या या औलादींना वेळीच ठेचले नाही, तर हिंदुस्थानचे इस्लामिक राष्ट्र झाल्यावाचून राहणार नाही, असा इशाराही राजा यांनी दिला.