मुंबई : १ जुलै २०२० रोजी आषाढी एकादशीचे निमित्त तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी लिहले होते की, साहेबांबद्दल समज-गैरसमज खूप पसरवले गेले. स्पेशली कुजबुज मोहीम आणि मीडियाने त्यांना प्रचंड बदनाम केले असल्याचे आव्हाडांनी म्हटले होतं. पुढे आव्हाड म्हणतात की, मागील ५० वर्षांपासून जे काम साहेबांनी या देशासाठी, राज्यासाठी, राज्यातील महिलांसाठी केले आहे, ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते.
सोबतच साहेबांनीदेखील केलेल्या कामाचे कधी मार्केटिंग केले नाही. पण आजपासून एक महिना तुम्हाला खूप इंटरेस्टिंग माहिती देत राहू. जमली तर नक्की वाचा, असं त्या पोस्टमध्ये लिहलं होतं. आणि पुढे त्याचं पोस्टमधील फोटोत ‘साहेब माझे विठ्ठल’ असं लिहतं. शरद पवारांचा मोठा मोठा देखील प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर अनेक वेळा तुम्ही आव्हाडांच्या तोंडून शरद पवार विठ्ठल असल्याचा उल्लेख ऐकला असेल. पण आता शरद पवारांना विठ्ठल मानणाऱ्या आव्हाडांवर एक संकट कोसळलयं. यात आव्हाड पुरते अडकलेत असं आव्हाडांना चांगलाच घरचा आहेर दिला. त्यानंतर विठ्ठल कोणता झेंडा घेऊ हाती? अशी परिस्थिती आव्हाडांची झाले नाही ना? रोहित पवार आणि आव्हाड यांच्यातील संघर्ष कधी सुरु झाला. आव्हाडांनी केलेल्या विधानामुळे ते एकटे पडलेत का?
२ जुलै २०२३ अजित पवारांनी आपल्याच काकांविरुध्दचा बंडाचं रणशिंग फुकंलं. आणि अजित पवार आपल्या ९ आमदारांसह फडणवीस- शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर शरद पवारांनी प्रेस काँन्फरन्स घेत. मी राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा आहे, असं विधान केलं. तसेच मी ही लढाई न्यायालयात लढणार नाही तर जनतेच्या न्यायालयात लढणार, असं विधान शरद पवारांनी केलं. आणि त्यानंतर पवारांनंतर सगळ्यात आधी जितेंद्र आव्हाडांनी अजितदादांच्या बंडाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर शांत बसतील ते पवार कसले ह्या न्यायाने रोहित पवार ही मैदानात उतरले. आणि त्यांनी ही अजितदादांविरोधात भुमिका घ्याला सुरुवात केली. त्यावेळी आव्हाड आणि रोहित पवार यांनी अजितदादांवर भरपूर टीका केली. त्यावेळी अजित पवारांनीही दि.१ डिसेंबर २०२३ निर्धार रॅली आयोजित केली. आणि निर्धार नवपर्वाचा,वैचारिक मंथन घडयाळ तेच वेळ नवी, असं म्हणत अजितदादांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीबद्दल गौप्यस्फोट केले. त्यावेळी मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही माझी चूक झाली का?, हा अजितदादांनी विचारलेला प्रश्न चांगलाच गाजला.
कारण त्यावेळी नकळत का होईना अजित पवार हे राष्ट्रवादीतील उत्तराधिकारी पदाकडे बोट ठेवू पाहतं होते. बंडानंतर ही सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीचं भविष्य म्हणून पुढे येत होती. पण त्यांना केंद्रीय राजकारणात मिळालेल्या कम्फर्ट झोनमुळे त्या महाराष्ट्रातल्या रागंड्या राजकारणात उतरल्या नाहीत. मग अशावेळी राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेता आणि प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आली पंरतु त्यानंतर काँग्रेसने देखील विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा ठोकला. ज्यामुळे काही दिवसातचं आव्हाडांना पुन्हा माघारी फिरावं लागलं. मग पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीसाठी मैदानात उतरून अस्तित्त्वाच्या लढाईत सहभाग नोंदवला. पण यासगळ्यात शरद पवार काँग्रेस हायकमांडशी बोलून आव्हाडांना विरोधी पक्षनेते पद मिळवून देऊ शकले असते. पण त्यांनी तसं का केलं नाही? हा ही मोठा प्रश्न आहे.
दरम्यान या सगळ्यात नंतर रोहित पवारांनीही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. आणि युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी पुणे ते नागपूर हा ८०० किमीचा प्रवास पायी केला. आता ह्या यात्रेचं फलित काय हा वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे. बरं ही यात्रा रोहित पवारांनी सुरु केल्यामुळे तिथे आव्हाडांना आपलं वेगळं असं स्थान निर्माण करत आलं नाही. मग दि. ३ जानेवारी रोजी जितेंद्र आव्हाडांनी राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रित्या वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर हे प्रकरण तिथेच संपलं असतं पण यावर रोहित पवारांनी आव्हाडांना घरचा आहेर दिला.
परदेशी दौऱ्यावर असणाऱ्या रोहित पवारांनी शिर्डीतल्या सभेला अनुउपस्थित असून ही आव्हाडांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांच्या राम मासांहारी असल्याच्या विधानावर ट्विट करत म्हणटलं की, व आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ, अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा टोला ही रोहित पवारांनी लगावला. त्यामुळे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. यात शंका नाही. मुळात एकीकडे शरद पवार, मविआतील अनेक मोठ्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याचे टाळलंल असताना, रोहित पवारांनी उघडउघड परदेशातून ट्विट करत आव्हाडांचा समाचार का घेतला? हा ही प्रश्न आहे. उदा दयाचं तर आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर प्रश्न विचारला असता, संजय राऊतांनी भर पत्रकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशावेळी आव्हाड-रोहित पवार यांच्या वादामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आलंय.
दरम्यान आव्हाडांनी ही “रोहित पवार काय बोलतात याला मी फार महत्त्व देत नाही. मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही. अजून लहान आहेत.त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे.अबुधाबी मध्ये जाऊन रोहित पवार यांना तिथून बसून बोलणं सोप्प आहे, असा टोला आव्हाडांनी लगावला. पण या सगळ्यात त्यांनी आणखी एक विधान केलं ते म्हणजे, आम्हाला शिबिरात काय बोलायचं त्याचे विषय दिले गेले होते.त्यामुळे प्रभू श्रीरामांवर बोलण्याचा ही विषय पक्षश्रेष्ठींच्या परवानगीने आव्हाडांनी मांडला का? असा प्रश्न ही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
त्यात दुसरीकडे रोहित पवारांच्या शिबीरातील अनुउपस्थिती असल्यामुळे तुमचा रोहित पवारांशी काही वाद आहे का? असा सवाल पत्रकारांनी जयंत पाटलांना केल्या पाटील म्हणाले की, मी खूप गरीब माणूस आहे. माझा कुणाशीही वाद होऊ शकत नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतोय. जे आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे. या सर्व विधानांमुळे रोहित पवार विरुद्ध जितेंद्र आव्हाड व्हाया जयंत पाटील असं काही पक्षात अंतर्गत शिजतयं का? असा ही प्रश्न विरोधकांकडून निर्माण केला जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यावर मौन बाळगून का आहेत? त्यामुळे जितेंद्र आव्हाडांचं विधान त्यांना भोवणार पण पक्षावर देखील त्यांचा काही परिणाम होणार का? याला दुजोरा दिला ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी. तटकरे म्हणाले की, रोहित पवारांनी आव्हाडांना जे सुनावलंयं ते योग्यचं केलं आहे. पवार गटात आत्ता फूट पडणार हे निश्चित दिसतंयं.