मुंबई : कोरोनाच्या जे.एन-१ प्रकारातील बाधित रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली आहे. पैकी सर्वाधिक ९१ रुग्ण पुण्यातील आहे. विशेष म्हणजे ३ जानेवारीपर्यंत ३२ वर असलेली जे.एन-१ रुग्णसंख्या एका दिवसात ७८ ने वाढल्यामुळे भिती व्यक्त केले जात आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जे.एन-१ बाधितांची संख्या ११० इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यातील ९१ रुग्ण एकट्या पुण्यात, तर ठाणे ५ आणि बीडमध्ये ३ रुग्णांची नोंद करण्यात आली. दुसरीकडे गुरुवार, दि. ४ जानेवारी रोजी १७१ नवीन कोरोनाबाधित आढळले. तर, दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ९१४ सक्रीय रुग्ण आहेत.