'म्हाडा'मध्ये नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन

    04-Jan-2024
Total Views | 29

mhada
मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 'म्हाडा लोकशाही दिन' म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
 
'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोकशाही दिंनांतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी/अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून निराकरण करण्यात येणार आहे. म्हाडा लोकशाही दिनासाठी अर्ज विहित नमुन्यात असणे आवश्यक असून त्याचे प्रपत्र १ 'अ' ते प्रपत्र 'ड' हे नमुने म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार अर्जदाराची तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे, तसेच अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात १४ दिवस अगोदर दोन प्रतींत पाठवणे आवश्यक आहे. नागरिकांना तात्काळ निर्णय देणे सुलभ व्हावे याकरिता विषयाशी निगडित संबंधित विभाग/मंडळ प्रमुख देखील हजर राहणार आहेत. तसेच म्हाडा लोकशाही दिनातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची पोच पावती दिली जाणार आहे.
 
सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याने जयस्वाल यांचा सोमवारी नियमित घेण्यात येणारा अभ्यांगत भेट दिवस होऊ शकणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. जयस्वाल हे दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी ४ ते ६ दरम्यान अभ्यांगत भेट (Visitors meet) कार्यक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्यांच्या अडचनींचे तात्काळ निराकरण करत आहेत.
 
न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे /देण्यात येणार आहे अशा प्रकरणाची पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल असे अर्ज म्हाडा लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी आठ दिवसात पाठवण्यात यावे व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकित करणे गरजेचे आहे. महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा दिन आयोजित करण्यात येणार असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस म्हाडा लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल.तसेच निवडणुकीकरता आचारसंहिता लागू केलेली असेल त्यावेळी म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121