भारतीय चित्रपटाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील - जावेद अख्तर

भारतीय चित्रपटाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील, अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जावेद अख्तर यांचे विधान

    04-Jan-2024
Total Views | 49

javed akhtar 
 
मुंबई : नुकताच अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. यावेळी पद्मभूषण जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, “भारतीय चित्रपटाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील”. तसेच, आता संवेदनशीलता आणि रसिकता याचा मिलाफ होत असताना अशा दिग्दर्शक आणि निर्मात्यांबरोबर आपण किती काळ राहतो, यावरही भवितव्य अवलंबून असेल, असेही मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
 
संवेदनशीलतेने व जबाबदारीने चित्रपटाकडे पाहतील तेव्हा भारतीय चित्रपटाला बळ मिळेल
 
९ व्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक अशोक राणे, उद्योगपती नंदकुमार कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम अशी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, “सामाजिक पातळीवरील विषमता, कायदे, न्यायालय आणि असंवैधानिक बाबींच्या विरोधात उभारणारा नायक उभा ठाकला. आताचा काळ असा नायक उभा करता येण्यासारखा नाही. संभ्रमाच्या कालावधीत चित्रपटातील व्यक्तिरेखासुद्धा नीटपणे सापडत नाही. त्यामुळे आता चित्रपट पाहणाऱ्यांची अधिक आहे. ते जेवढे संवेदनशीलतेने व जबाबदारीने चित्रपटाकडे पाहतील तेव्हा भारतीय चित्रपटाला बळ मिळेल”.
 
चित्रपट बनविण्यापेक्षा दुसरे कुठले मोठे काम नाही : अनुभव सिन्हा
 
दिग्दर्शक आर. बाल्की म्हणाले की, “मी या शहरात पहिल्यांदा आलो आहे. चित्रपटाला या भागामध्ये गंभीरपणे घेतले जाते, असा हा भाग असून या भागामध्ये एमजीएम फिल्म इन्स्टिट्यूट निर्माण केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळालेली आहे. चित्रपट बनविण्यापेक्षा दुसरे कुठले मोठे काम नाही. विशेषत: चित्रपट क्षेत्रामध्ये काम करीत असताना खूप मानसन्मान मिळतो”, असे दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121