फक्त रामाबद्दलच नव्हे तर गांधींबद्दलही आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य!
04-Jan-2024
Total Views | 85
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. परंतू, केवळ रामाबद्दलच नाही तर महात्मा गांधीजींबद्दलही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गांधीजी ओबीसी असल्याने त्यांची हत्या केली असल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे.
बुधवारी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "गांधीजींची हत्या १९४७ साली झाली नाही तर त्यांच्यावर पहिला हल्ला १९३५ साली, दुसरा १९३८ साली आणि तिसरा हल्ला १९४२ साली झाला. हे हल्ले का केले? कारण यांना गांधीजी नकोच होते. कारण ते बनिया होते आणि ओबीसी होते. एवढ्या मोठ्या चळवळीचा नेता हा ओबीसी आहे हे त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या हत्येमागचं खरं कारण जातीयवाद आहे," असेही ते म्हणाले आहेत.