लॉर्ड बुद्धा टीव्ही आता बघा ॲपवर! उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ३१ जानेवारीला लोकार्पण

    31-Jan-2024
Total Views | 138

Lord Buddha app


मुंबई :
देशाच्या २२ राज्यांतील घराघरात अत्यंत श्रध्देने आणि आवडीने बघितले जाणारे 'लॉर्ड बुद्धा' हे टीव्ही चॅनेल आता मोबाइल ॲपवर बघता येणार आहे. येत्या ३१ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "बुद्धा प्ले" या एंड्राइड टिवी आणि मोबाईल ॲपचे लोकार्पण होत आहे.
 
३१ जानेवारी २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉइंट, मुंबई येथे सायंकाळी ७ वाजता लोकार्पण सोहळा होईल. सोहळ्याला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे असून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी सनदी अधिकारी सुब्बचन राम, सामाजिक कार्यकर्ता रवी राव, गुजरात येथील उद्योजक प्रदीप पाटील, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक सचिन मून व भैय्याजी खैरकर, जेतवन बुध्द विहार यवतमाळचे रमेश बन्सोड हे प्रामुख्याने उपस्थित राहतील. पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ हे स्वागताध्यक्ष आहेत.
 
कार्यक्रमाला बहुजन समाजातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक राजू मून, महेश नागपुरे, किशोर दाणी, सुमित खोब्रागडे, विनोद चांदमारे, राजेश खिल्लारे, विकास कडलक, सिद्धार्थ भालेराव, गोवर्धन बिहाडे, लक्ष्मण मगर, उत्तम इंगळे, विवेक जगताप आणि बाळासाहेब बेंगळे यांनी केले आहे.
 
यांचा होणार सत्कार
 
पुण्याचे युवा उद्योजक धर्मेंद्र सोनकर, केबल सेना मुंबईचे अध्यक्ष मंगेश वाळंज, नागपूर केबल ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष बांते, नागपूरच्या राधाकृष्ण हॉस्पिटलचे अध्यक्ष गोविंद पोद्दार, डॉ. वीरेंद्र काळे, लातुरचे माजी खासदार सुनील गायकवाड़, आंबेडकरवादी मिशन नांदेड़चे दिपक कदम, उद्योजक तथा चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे.
 
काय आहे "बुद्धा प्ले" ॲप?
 
लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक सचिन मून यांनी याबाबत सांगितले की, "लॉर्ड बुद्धा टीव्ही हे आंबेडकरवाद आणि बुद्धाच्या धम्माला समर्पित असे भारतातील एकमेव उपग्रह चॅनेल असून ते गेल्या १३ वर्षांपासून अव्याहत सुरू आहे. हे चॅनेल आता कुठेही आणि कोणत्याही वेळी बघता यावे, यासाठी "बुद्धा प्ले" ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपमध्ये प्रेक्षकांना लॉर्ड बुद्धा टीव्ही, लॉर्ड बुद्धा म्यूझिक चॅनेल आणि विदर्भ टीव्ही न्यूज चॅनेल निःशुल्क बघता येईल."


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121