नवी दिल्ली : "तुम्ही मुस्लीमांचे आभार मानले पाहिजे! त्यांनी मंदिरं पाडली पण अवशेष जतन केलेत!", असे विधान इस्लामिक विचारवंत अतिक उर रहमान यांनी केले आहे. ते म्हणाले, इस्लामिक आक्रमकांनी हिंदू मंदिरांची केलेली विटंबना कमी करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यांनी दावा केला की, हिंदू मंदिरांच्या वर बांधलेल्या मशिदींचे पुरावे नष्ट न करण्याचे श्रेय मुस्लिम समुदायाला दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात विवादित ज्ञानवापी मशीद आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यासंदर्भात बोलताना रहमान म्हणाले की, मुस्लीम बाजू पुसून टाकता आली असती असे सांगतानाच मुस्लिम ज्ञानवापी मशिदीत नमाज अदा करू शकत नाहीत कारण मशीद हिंदू मंदिराच्या वर बांधली गेली आहे, असा दावादेखील त्यांनी यावेळी केला.
त्याचबरोबर, “मुस्लिम बाजू सर्व काही पुसून टाकू शकली असती. मंदिराची प्रत्येक खूण पुसून टाकता आली असती पण त्यांनी ती ठेवली. त्यांनी ते का ठेवले? कारण त्यांना आव्हान दिले जाणार नाही असे आश्वासन दिले होते. आणि त्यांनी त्या कलाकृतींचा आदर केला, असेही अतिक उर रहमान यांनी सांगितले.