"इस्लामच्या विरोधात कृत्य कराल, तर..." - प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावणाऱ्या इमाम इलियासी यांच्याविरोधात फतवा

    30-Jan-2024
Total Views | 217
 umer ilyasi
 
नवी दिल्ली : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिलेले दिल्लीचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांना कट्टरपंथीयांकडून धमकीचे फोन येत आहेत. त्याबरोबरच काही मुस्लिम संघटनांनी त्यांच्याविरोधात फतवा सुद्धा जारी केला आहे. मुस्लिमाने इतर कोणत्याही धर्माच्या मंदिरात जाऊ नये, असे फतव्यामध्ये सांगण्यात आले आहे. इलियासीच्या राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्यामुळे इस्लामच्या तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा दावा या मुस्लिम संघटनांनी केला आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झालेले दिल्लीचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांच्याविरोधातही फतवा काढण्यात आला आहे. फतव्यामध्ये इलियासीचे वर्णन 'देशद्रोही' असे करण्यात आले असून त्याने इस्लामच्या विरोधात काम केल्याचे म्हटले आहे. इलियासीने भविष्यात असे कृत्य केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा फतव्यात देण्यात आला आहे.
 
फतवा जारी झाल्यानंतर इलियासी म्हणाले, “माझा द्वेष करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे. मी एक भारतीय नागरिक आहे आणि मी माझ्या देशाच्या संस्कृती आणि धर्मांचा आदर करतो. पुढे बोलताना ते म्हणाले की, "मुख्य इमाम म्हणून मला श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टकडून निमंत्रण मिळाले होते. दोन दिवस विचार करून मी अयोध्येला जायचे ठरवले होते. आता फतवा निघाला असला तरी, मला २२ जानेवारीच्या संध्याकाळपासून धमकीचे फोन येत आहेत."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121