कल्याणात 'रोजगार आपल्या दारी' कार्यक्रमाच्या माध्यमातून नोकरीच्या हजारो संधी

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने रोजगार मेळाव्याचे आयोजन.

    24-Jan-2024
Total Views | 28
 
 
vishwanath bhior
 
 
 
कल्याण  : कल्याणात येत्या शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत साई हॉल, वायले नगर, कल्याण पश्चिम येथे रोजगार आपल्या दारी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील तब्बल 4 हजार संधी उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्ये खासगी क्षेत्रासोबतच शासकीय विभागातीलही निवडक पदांसाठी इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत.
एकीकडे राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमाला राज्यभरात जबरदस्त प्रतिसाद मिळत असताना आता कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्याच धर्तीवर रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये नवी मुंबई, सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर आणि ठाणे कल्याण भागातील 30 हून अधिक नामांकित खासगी कंपन्यांचा सहभाग आहे. तर शासकीय विभागातील काही निवडक पदेही या मेळाव्याच्या माध्यमातून भरली जाणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.
चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, ई कॉमर्स, हॉटेलिंग, ओव्हर सीज आदी 26 प्रमूख क्षेत्रातील 4 हजार रिक्त पदे यावेळी भरण्यात येणार आहेत. त्यामुळे कल्याणमधील अधिकाधिक इच्छुकांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.
 
या मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी संपर्क 8080676865/7506471209
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121