ठाकरे-पवारांच्या नेत्यांना 'ईडी'चा दणका! 'या' दिवशी रहावे लागणार चौकशीसाठी हजर
23-Jan-2024
Total Views | 51
मुंबई : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटातील नेत्यांना ईडीचा दणका बसला आहे. या नेत्यांवर असलेल्या आरोपांबद्दल त्यांना ईडीने समन्स बजावले आहेत. यामध्ये उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांचा समावेश आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत या तिन्ही नेत्यांना दिलेल्या ईडीच्या समन्सचे वेळापकच जाहीर केले आहे. त्यानुसार आमदार रवींद्र वायकर यांना २३ जानेवारी रोजी ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. त्यांच्यावर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप आहे.
तसेच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावले आहेत. २४ जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. यासोबतच उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील बॉडीबॅग घोटाळ्याचा आरोप असून २५ जानेवारी रोजी त्यांची चौकशी होणार आहे.