मुंबई : देशातील वातावरण राममय झाले आहे. सर्वत्र केवळ सीयावर रामचंद्र की जय आणि जय श्री राम हेच जयघोष ऐकू येत आहेत. अयोध्या नगरी देखील प्रभू रामाच्या स्वागतासाठी अगदी नववधूसारखी सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज २२ जानेवारी रोजी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा राम मंदिराच्या गर्भगृहात झाली. या सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. दरम्यान, अनेक कलाकारांनी सोशल मिडियावरुनही रामाचा जयघोष करत आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्री अदा शर्मा हिने आपल्या सुमधूर आवाजत श्री रामाचे भजन गात सर्व राम भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.