मुंबई : संपुर्ण जगाचे लक्ष सध्या अयोध्येकडे लागले आहे. ५०० वर्षांता वनवास संपवून अखेर प्रभू श्रीराम घरी परतणार आहेत. २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी चंदेरी विश्वातील कलाकार देखील उत्सुक आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी सामान्यांपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांपर्यंत सर्वांनीच देणगी दिली आहे. कुणी विटा दान केल्या तर कुणी पैशांची देणगी दिली आहे. जाणून घेऊयात कोणी काय काय देणगी दिली...
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी पैशांची देणगी दिली असून ती रक्कम किती आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. याशिवाय त्यांनी लोकांना रक्तदान करण्याचे आवाहनही केले आहे.
अभिनेते अनुपम खेर यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी विटा दान केल्या आहेत. मंदिर ज्यावेळी उभारले जात होते त्यावेळी अनुपम खेर यांनी अयोध्येत जाऊन पाहणी देखील केली होती आणि मंदिराच्या बांधकामाचा व्हिडिओ देखील शेअर केला होता.
अभिनेता अक्षय कुमार याने देखील राम मंदिराला पैशांची रक्कम देणगीस्वरुपात दिला आहे.
याशिवाय अभिनेते मुकेश खन्ना यांनी १,११,१११ रुपयांची देणगी दिल्याचे त्यांनी जाहिर केले होते. तसेच, अभिनेते मनोज जोशी यांनी देखील ठराविक रक्कम प्रभू रामाच्या मंदिराठी देऊ केली.
दाक्षिणात्य कलाकारांनी देखील राम मंदिराच्या उभारणीसाठी फुल न फुलाची पाकळी नक्कीच दिली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने १ लाख रुपयांची देणघी दिली आहे. तसेच, दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण यांनी ३० लाख रुपये दान केले आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर याने तब्बल १ कोटी रुपयांचे दाम राम मंदिराच्या निर्माणासाठी दिले आहेत. तसेच, मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता गुरमीत चौधरी याने देखील गुप्त धनराशी दान केली आहे.