रामसेवकांच्या संघर्षाचे फलित... भव्य श्रीराम मंदिर

    20-Jan-2024
Total Views | 42

Atul Bhatkhalkar


संघर्ष म्हणजे काय आणि संघर्ष काय असतो, याचा खरा अनुभव कोणी घेतला असेल, तर तो रामसेवकांनी. कारण, ५५० वर्षं ज्या गोष्टीसाठी रामसेवकांनी संघर्ष केला, त्याचे गोड फलित आज प्रत्येकास मिळताना दिसतंय. अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर होत असलेले प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे निर्माणकार्य हा सर्व हिंदू बांधवांसाठी आनंदाचा क्षण आहे. कारण, मंदिर निर्माणाच्या कार्यात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा दर्शविला आहे. मुळात या संघर्षाची सुरुवात झाली ती जवळपास ९०च्या दशकात.
 
श्रीराम जन्मभूमीवर उभा असलेला गुलामीचा ढाँचा एकूण एक रामभक्ताच्या डोळ्यांना खुपत होता. मग लालकृष्ण अडवाणी असो, मुरली मनोहर जोशी असो किंवा विश्व हिंदू परिषद-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या संघटना; यांनी सर्वप्रथम श्रीराम जन्मभूमीस्थानावर मंदिरनिर्माणाच्या कार्याबाबत जनजागृती करण्याचा निश्चय हाती घेतला. ही मंडळी म्हणजे यामागचे खरे प्रणेते. त्याकाळी श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनाकरिता सह्या गोळा करण्याचे अभियान देशभरात चालवण्यात आले होते. मीसुद्धा या अभियानात सहभागी झालो होतो. सह्या गोळा करण्याच्या उद्देशाने मग गावोगावी जाऊन खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत पोहोचून संपर्क करण्यात आला. त्यातून लोकजागरण आणि गृहसंपर्क मग सुरू झालं. आज माझी जरी राजकीय नेता म्हणून ओळख असली, तरी याआधी संघ स्वयंसेवक आणि मुख्य म्हणजे रामसेवक म्हणून माझी ओळख आहे.
 
1989 ला शिलापूजन झाले तेव्हा मी जिल्हा प्रचारक होतो. शिलापूजनासाठी जागोजागी फिरण्याचा ज्यावेळी योग आला, तेव्हा ‘श्रीरामाच्या मंदिरासाठी हे राष्ट्रकार्य होत आहे’ या विचारामागचा उत्साह सर्वत्र दिसत होता. पुढे मग देशभरातून त्या शिला अयोध्येत पाठवण्यात आल्या. दि. ९ नोव्हेंबर, १९८९ मध्ये अयोध्येत पहिल्यांदा श्रीराम मंदिराचा शिलान्यास झाला. यावेळी संपूर्ण अयोध्या ‘सौगंध राम की खाते हैं मंदिर वहीं बनाएँगे’ या एकाच जयघोषात दुमदुमली होती. १९९० आणि १९९२ या दोन वर्षी कारसेवा झाल्या. मी प्रमोद महाजनांसह १९९२च्या कारसेवेला गेलो होतो. संघाचा प्रचारक म्हणून जेव्हा मी निघालो तेव्हाच ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार घेऊन बाहेर पडलो होतो. त्यामुळे अयोध्येतील राष्ट्रमंदिराच्या आंदोलनासाठी आपणही खारीचा वाटा उलचावा, हा विचार स्वाभाविचक तेव्हा मनात आला आणि कारसेवेला जायचं पक्कं झालं.
 
१९९२ला ‘याची देही याची डोळा’ ती गुलामीची निशाणी नष्ट होताना पाहिली होती. त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्राची लहान मूर्ती उभारण्यात आलेल्या तंबूमध्ये विराजमान झाल्याचे पाहिले होते. हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण जरी असला, तरी एक संतापाची भावनाही होती. त्याचे कारण होते तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वातील सरकारने रामभक्तांवर केलेला गोळीबार. अयोध्येत दि. २ नोव्हेंबरच्या दिवशी कारसेवकांवर गोळीबार झाला होता. तेव्हा झालेल्या लाठीचार्जमध्ये वृद्धांनाही सोडले नाही, त्यांनाही मारहाण करण्यात आली होती. हनुमानगढी येथे हुतात्मा झालेल्या कोठारी बंधूंचे स्मरण याक्षणी निश्चितच होत आहे.
 
अयोध्येत जमलेल्या या कारसेवकांच्या बलिदानाचेच हे फलित आहे की, आज अयोध्येत उभे राहणारे श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिलेले दिसत आहे. मुलायम सिंह यांचे निधन झाल्यानंतर समाजमाध्यमांवर मी एक भूमिका मांडली होती की, ’ज्यांनी कारसेवकावर गोळ्या चालवल्या, लाठ्या चालवल्या, त्या मुलायमसिंहने भव्य राम मंदिराची निर्मिती पाहून प्राण सोडला.’ एकूणच कारसेवा ते आता उभे राहिलेले भव्य मंदिर हा प्रवास सर्वांसाठीच आनंददायी व प्रेरणादायी होता. दरम्यान अनेक वैचारिक संघर्षानंतर उभे झालेले हे मंदिर ५५० वर्षांचे गोड फलित आहे. एका मंदिरासाठी भारतातील लक्षावधी ज्ञात-अज्ञात हिंदूंनी संघर्ष केला. जगाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण आहे की, एका मंदिरासाठी ५५० वर्षं लोकांनी संघर्ष केला; ते मंदिर आज उभ राहतंय. त्यामुळे ही अत्यत आनंदाची, अभिमानाची, राष्ट्रप्रेम व संस्कृती जागृत करणारी घटना आहे. जय श्रीराम!
 
- अतुल भातखळकर 
(लेखक भाजपचे नेते असून कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा
२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

Waqf Board गुजरात राज्यातील असलेल्या अहमदाबादमध्ये वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) कोट्यवधि दुकानाच्या जमिनीवर अवैधपणे दुकाने बांधली होती. यावरून संबंधितांनी वक्फचे विश्वस्त असल्याचा दावा केला आणि दुकाने भाड्याने दिली आणि २० वर्षांपूर्वीचे असलेले भाडे वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित भाडे हे वक्फ बोर्डाच्या खात्यावर जाण्याऐवजी पाच व्यक्तींच्या खिशात जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित प्रकरणाची माहिती ही वक्फ बोर्डाला कळाल्याची माहिती तक्रारीत नमूद केले होते. मात्र, तरीही कारवाई करण्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121