जगातील सर्वात मोठ्या दीपोत्सवात सहभागी व्हा; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीतर्फे "अपने अपने राम" रामकथेचे आयोजन

    20-Jan-2024
Total Views | 27
cb
 
पुणे : "अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांचे ५२७ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले स्वप्न पूर्ण होत असून, येत्या सोमवारी (दि. २२) जगातील सर्वात मोठा दीपोत्सव साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान होतील. या दीपोत्सवात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विश्वविक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करावे," असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 
संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील 'अपने अपने राम' या तीन दिवसीय विशेष कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. टिळक रस्त्यावरील एसपी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या भव्य रामनगरीमध्ये अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृतीच्या साक्षीने होत असलेल्या या कार्यक्रमावेळी हभप योगिराज महाराज गोसावी पैठणकर, हभप पंकज महाराज गावडे, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, साध्वी वैष्णव दीदी सरस्वती, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, उपाध्यक्ष राजेश पांडे, हेमंत रासने, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, दादा वेदक, मा. का. देशपांडे, पतित पावन संघटनेचे नितीन सोनटक्के उद्योजक रविंद्र रांजेकर, प्रसाद देशपांडे, नंदू घाटे, सारंग काळे आदी उपस्थित होते.
 

cb
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "एकविसाव्या शतकातील पिढी घडवणारा 'अपने अपने राम' हा कार्यक्रम आहे. वाल्मिकी रामायण अतिशय कलात्मक व काव्यात्मक पद्धतीने सांगण्याची शैली डॉ. कुमार विश्वास यांची असून, या रामकथेतून प्रत्येकाने मूल्ये, संस्कार शिकण्याची गरज आहे. हा कार्यक्रम प्रत्येकाला जगण्याची दिशा देणारा आहे. अयोध्येत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या उत्सवात आपण प्रत्येकाने सहभागी व्हावे."
 
"देशभर साजरा होणाऱ्या या उत्सवात प्रत्येकाला सहभागी होता यावे, यासाठी शासकीय सुटी देण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सरकारने सुटी जाहीर केली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मोदीजींनी गेल्या ११ दिवसांपासून अनुष्ठान केले असून, मनोभावे रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत," असेही बावनकुळे यांनी नमूद केले.
 
मुरलीधर मोहोळ म्हणाले, "डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध करून देताना आनंद होतो आहे. अयोध्येत रामलला विराजमान होत असताना देशातील वातावरण राममय झाले आहे. शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे स्वप्न साकारत आहे, हा आपल्या सर्वांसाठी उत्साहाचा क्षण आहे."

अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..