कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश; महाराष्ट्रात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
19-Jan-2024
Total Views | 68
मुंबई : २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, यादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४ जानेवारी २०२४ रोजी केली होती. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश आले असून, महाराष्ट्र सरकारद्वारे २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
श्रीराम हे अवघ्या भारत देशाचे आराध्य आहेत. अयोध्या येथील मंदिर, हे केवळ मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे. त्यामुळे २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत रामललांची प्राणप्रतिष्ठापना होताना महाराष्ट्रात जाहीर सुट्टी असावी, ही सकल हिंदू समाजाची मागणी मान्य केल्याबबदल मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
दिवाळी साजरी करण्याचं एक कारण म्हणजे प्रभू श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा अयोध्येस परतले होते. आज ५०० वर्षानंतर प्रभू श्रीराम पुन्हा अयोध्येत परतणार हा क्षण म्हणजेच दिवाळी आणि आपल्या राजाच्या स्वागतासाठी हि दिवाळी जल्लोषातच साजरी झाली पाहिजे. त्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन करताना मंत्री लोढा म्हणाले होते.