मुंबई : "मी तुम्हाला हेही सांगायला आलो आहे की, ना मोदींना घाबरू नका, ना शहांना घाबरू नका, ना सरकारला घाबरू नका, कोणाला घाबरू नका, फक्त अल्लाचे भय बाळगा." असा सल्ला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना दिला आहे. हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी ३६ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिप एक्स हँडलवर शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी हे विधान केलेले आहे.
याचं व्हिडिओमध्ये पुढे बोलताना ते म्हणाले की, "आम्ही फक्त त्यालाच घाबरतो ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, आम्ही इतर कोणालाही घाबरत नाही. मी पापी आहे, पापी आहे, पापी आहे, मी काय आहे हे माझ्या प्रभूला माहीत आहे. पण मला फक्त अल्लाची भीती वाटते.”
मागच्या काहीकाळापासून असदुद्दीन ओवेसी हे सतत भाजप आणि हिंदुत्वावर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच रामजन्मभूमीबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती.