"हात कापून टाकू" - इस्लामिक संघटनेच्या नेत्याने दिली धमकी
14-Jan-2024
Total Views | 376
कोची : केरळमध्ये 'समस्त केरळ सुन्नी स्टुडंट्स फेडरेशन' (एसकेएसएसएफ) या इस्लामिक संघटनेच्या नेत्याचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. एसकेएसएसएफचे उपाध्यक्ष सतार पंथल्लूर यांनी हात कापण्याची धमकी दिली आहे. यानंतर पोलिसांनी शनिवारी (१३ जानेवारी) एफआयआर नोंदवला. समस्त केरळ सुन्नी स्टुडंट्स फेडरेशन ही 'समस्त केरळ जमियातुल उलेमा' या इस्लामिक संघटनेची विद्यार्थी शाखा आहे.
केरळ जमियातुल उलेमाच्या अधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्यांचे हात कापण्याची धमकी सातार यांनी दिली आहे. मलप्पुरम, केरळ येथे एका सभेत बोलताना, सातार म्हणाले, “जो संघटनेच्या नेत्यांचा अपमान करेल किंवा त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करेल त्याचे हात एसकेएसएसएफचे कार्यकर्ते कापून टाकतील. संघटनेचे कार्यकर्ते त्यासाठी प्राणाची आहुती देण्यास तयार आहेत."
सातार पंथल्लूरच्या या वक्तव्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मलप्पुरममधील एका व्यक्तीने सतार पंथल्लूरविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे दंगल भडकू शकते, असे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे म्हणणे आहे.