उबाठा गटाला नार्वेकरांविरोधात आंदोलन भोवलं; नेत्यांसह ९ कार्यकर्त्यांना अटक
13-Jan-2024
Total Views | 363
नागपूर : नागपुर येथील मौदा पोलिसांनी १२ जानेवारीला नागपूर ग्रामीणचे उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले यांच्यासह ९ जणांना अटक केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याविरोधात ते आंदोलन करत होते. यावेळी सरकारी कामात बाधा आणल्यामुळे भांदवि कलम ३५३ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून देवेंद्र गोडबोले आपल्या कार्यकरत्यांसह आमदार अपात्रता निकाल मान्य नसल्याने आंदोलन करत होते. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली त्याचबरोबर मुंडन आंदोलमनही केले. मौदा पोलिसांनी यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावर देवेंद्र यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे गुन्हा दाखल केला व देवेंद्र गोडबोले यांच्यासह ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत उद्धव ठाकरें विरोधात बंड केल्याने शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजिनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारकाई करावी म्हणुन याचिका दाखल करण्यात आली. त्यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या आमदाराला अपात्र केले नाही पण विधानसभा आणि लोकसभेत ७०% बहूमत असल्याने शिवसेना शिंदेंचीच आहे असा निकाल दिला. तो निकाल मान्य नसल्याने देवेंद्र गोडबोले यांनी हे आंदोलन केले होते.