राष्ट्रीय चेतनेच्या जाणीव-जागृतीचा ‘टिपिंग पॉईंट’

    13-Jan-2024
Total Views | 177
Ram Mandir Pran Pratistha


बाळासाहेब देवरस आणि दत्तोपंत ठेंगडी यांनी वर्णन केलेला ‘टिपिंग पॉईंट’जवळ येत आहे. रवींद्रनाथ टागोरांचा आदिवासी समाज सक्रिय होत आहे, असे दिसते. राष्ट्रीय जीवनाच्या अनेक क्षेत्रांत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले राष्ट्रहिताचे मूलभूत बदल एकामागून एक होत आहेत. देशाच्या संरक्षण धोरणात आणि परराष्ट्र धोरणात जग मूलभूत बदल अनुभवत आहे.

अयोध्येत दि. २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या, भव्य मंदिरात श्रीरामललाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न होणार आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात या सोहळ्याचा उत्साह, आनंद ओसंडून वाहताना दिसत असून, सर्वत्र उत्सवाचे वातावरण तयार झाले आहे.तीन वर्षांपूर्वी म्हणजेच दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी श्रीराम मंदिराच्या पायाभरणीचा शुभारंभ झाला, तेव्हादेखील सर्वत्र असेच उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. जगभरातील भारतीय वंशाचे लोक असो किंवा इतर भारतप्रेमींनी तो सोहळा अतीव उत्साहाने पाहिला. या दृश्याने असंख्य लोकांना स्वप्नपूर्तीचा अनुभव आणि आनंद दिला. प्रदीर्घ संघर्षानंतर हे यश प्राप्त झाले. यावेळी असंख्य भारतीयांच्या चेहर्‍यावर संकल्पाची चमक आणि डोळ्यातील आनंदाश्रू दिसत होते. बर्‍याच लोकांसाठी हा एक कर्तृत्वाचा क्षण असेल. पण, प्रत्यक्षात हा प्रारंभाचा क्षण आहे. अनेकांच्या मते, हा केवळ प्राणप्रतिष्ठा, स्वप्नपूर्ती, महत्त्वाचा प्रसंग असेल; परंतु भारतीय परंपरा, विचार आणि तत्त्वज्ञान हे अभिन्न आणि सर्वांगीण आहे.

भारतात धर्म आणि सामाजिक जीवन एकमेकांपासून वेगळे म्हणून पाहिले जात नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा अंश आहे, असे मानणार्‍या या भारतीय तत्त्वज्ञानाने ती ईश्वरभक्ती प्रकट करून, मोक्षप्राप्तीचे ध्येय माणसासमोर ठेवले. एखाद्याच्या आंतरिक आणि बाह्य स्वरुपाचे नियमन करून, हे देवत्व प्रकट करण्याचे मार्ग (धर्म) त्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार अनेक आणि भिन्नदेखील असू शकतात. वास्तविक सर्व समान आहेत, अशी भारतीय धारणा आणि भारतानेही ते जगले आहे. संपूर्ण जगाने भारताचा हा इतिहास वेळोवेळी अनुभवला. पण, हा आध्यात्मिक मार्ग अवलंबतानाही भारताने भौतिक संपत्ती आणि समृद्धीकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. त्यामुळे पुरुषार्थ चतुष्ट्यामध्ये धर्म आणि मोक्षासोबतच अर्थ आणि काम यांचाही समावेश आहे.
 
’उबंटू’ ही एक आफ्रिकन संकल्पना, ज्याचा अर्थ ‘मी आहे, कारण, आपण आहोत,’ असा होतो. भारतातील धर्माची कल्पना करण्याचाही हाच आधार आहे. मी, माझे कुटुंब, गाव, राज्य, राष्ट्र, मानवता, मानवेतर प्राणी, निसर्ग हे सर्व एकमेकांशी जोडलेले आणि हळूहळू विस्तारत जाणारे एकक आहेत. ते एकत्व आहे. त्यांच्यात परस्पर संघर्ष नाही, समन्वय आहे, स्पर्धा नाही, संवाद आहे. या सर्व घटकांचा संच म्हणजे आपले मानवी जीवन. या सर्वांमुळेच आपण सर्व अस्तित्वात आहोत. यातील समतोल म्हणजे धर्म आणि हा समतोल राखणे म्हणजे धर्माची स्थापना होय. भारताची ही धार्मिक दृष्टी केवळ ’धर्मा’पुरती मर्यादित ठेवणे चुकीचे आहे आणि ते केवळ अध्यात्मापुरते मर्यादित ठेवणेही अयोग्य आहे. अध्यात्मिक साधना करताना, भारताने कधीही भौतिक समृद्धीला विरोध केला नाही किंवा प्रतिबंधित केले नाही. भारतीय तत्त्वज्ञानातील धर्माची एक व्याख्या आहे- ’यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धिः स धर्मः’ अभ्युदय म्हणजे भौतिक समृद्धी आणि निश्रेय म्हणजे मोक्ष. या दोन्ही गोष्टी ज्याला प्राप्त होतात, तोच ‘धर्म’ आहे, असे म्हटले आहे. ईशावास्य उपनिषदात भौतिक समृद्धी प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाला अविद्या आणि मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाला ‘विद्या’ म्हणतात.उपनिषद म्हणतात की, जो अविद्या आणि विद्या या दोन्हींची उपासना करतो, त्याला पूर्ण जीवन प्राप्त होते. तो अज्ञानाच्या आधारे हे नश्वर जग आनंदाने पार करतो आणि ज्ञानाच्या आधारे अमरत्व (मोक्ष) प्राप्त करतो.
 
विद्याञ्च अविद्याञ्च यस्तद् वेदो डभयम् सह। अविद्यया मृत्युम् तीर्त्वा विद्यया डमृतमश्नुते॥


धर्माचा हा समतोल एक विशेष गुण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांद्वारे देशभरातील कोट्यवधी कंठातून दररोज निघणार्‍या संघ प्रार्थनेत समुत्कर्ष (अभ्युदय) आणि निश्रेय या दोन्हींच्या जोपासनेविषयी सांगितले जाते. वास्तविक, हे दोन नसून एकाचेच दोन पैलू आहेत, हे दाखवण्यासाठी एकवचन सहावा प्रत्यय ’अस्य’ वापरला आहे. याचा अर्थ असा की, भारतामध्ये जीवनाचा संपूर्ण विचार करण्याची परंपरा आहे, ज्यामध्ये भौतिक (समृद्धी) आणि आध्यात्मिक (मोक्ष) उन्नती यांचा एकत्रितपणे विचार केला गेला आहे. शेकडो वर्षे भारत हा जगातील सर्वात समृद्ध देश होता. शक्तिशाली असूनही भारताने इतर देशांवर युद्धे लादली नाहीत. व्यापारासाठी जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊनही भारताने त्यांची वसाहत केली नाही, त्यांचे शोषण केले नाही, त्यांची लूट केली नाही, त्यांचे धर्मांतर केले नाही, त्यांना गुलाम बनवले नाही आणि व्यापार केला नाही. आपल्या लोकांनी तिथल्या स्थानिक समुदायांना समृद्ध केले आणि पुढे सुसंस्कृत केले. त्या सांस्कृतिक वारशाचे जीवंत दर्शन आजही दक्षिण आशियामध्ये वसलेल्या देशांतील भाषा, कला, मंदिरे आणि जीवनशैलीत दिसून येते. भारतीयांनी इतर देशांत जाऊन त्यांना संपन्न आणि सक्षम बनवून जी समृद्धी मिळवली, तिला आपल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानात ’महालक्ष्मी’ असे म्हणतात. इथे धन नव्हे, तर धनलक्ष्मी, महालक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे आपल्या समृद्धीचा आणि आपल्या सुसंस्कृत नैतिकतेचा आधार हा धर्म (रिलिजन नव्हे) राहिला आहे आणि मंदिरे हे या धर्माच्या स्थापनेचे आणि आचरणाची केंद्र राहिली आहेत.

कारण, संपूर्ण जीवनाच्या संपूर्ण चिंतनाचा आधार अध्यात्म आहे. म्हणूनच भारतातील मंदिरे आध्यात्मिक साधनेचे तसेच उदात्त लोकाचार आणि आर्थिक समृद्धीचे स्रोत आणि केंद्र आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५१ मध्ये सोमनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठा करताना, केलेल्या भाषणात याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यातील काही उतारे मूळ स्वरूपात वाचणे माहितीपूर्ण ठरेल. ते म्हणतात की, “या शुभ प्रसंगी आपण सर्वांनी शपथ घेणे योग्य आहे की, आज आपण आपल्या ऐतिहासिक श्रद्धेच्या या प्रतीकाला, त्याचप्रमाणे आपण आपल्या देशाच्या या प्रतीकाला पुन्हा अभिषेक केला आहे. सामान्य लोकही त्या समृद्धी मंदिराला पूर्ण समर्पणाने आपले जीवन अर्पण करतील, ज्याचे प्रतीक सोमनाथचे जुने मंदिर होते. त्या ऐतिहासिक काळात आपला देश जगाचे औद्योगिक केंद्र होता. येथे उत्पादित वस्तूंनी भरलेले काफिले दूरच्या देशांत जात असत आणि जगातील चांदी आणि सोने मोठ्या प्रमाणात या देशात आणले गेले. त्या काळात आपली निर्यात प्रचंड होती आणि आयात खूपच कमी होती. त्यामुळे भारत हा त्या काळात सोन्या-चांदीचा भांडार होता. ज्याप्रमाणे आज जगातील सोने श्रीमंत देशांच्या बँकांच्या तळघरांमध्ये पुरेशा प्रमाणात पडून आहे, त्याचप्रमाणे शतकानुशतके आपल्या देशात जगातील सर्वाधिक सोने आपल्या मंदिरांमध्ये होते. मला असे वाटते की, भगवान सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण त्याच दिवशी पूर्ण होईल, ज्या दिवशी या दगडाच्या पायावर ही भव्य वास्तू उभी राहील आणि त्याच दिवशी भारताच्या समृद्धीचे भवनही उभे राहिलेले असेल, ज्याचे सोमनाथचे हे प्राचीन मंदिर प्रतीक आहे. तसेच तोपर्यंत सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी पूर्ण होणार नाही, जोपर्यंत या देशाच्या संस्कृतीचा स्तर उंचावत नाही. वर्तमानातील कोण्या अलबरुनीने आपली आजची सांस्कृतिक परिस्थिती बघितल्यानंतर, त्याने आजच्या जगाला तेच सांगितले पाहिजे, ज्या भावना आपल्याच संस्कृतीबद्दल त्याने फार पूर्वीही कथन केल्या होत्या.”

राम मंदिर आंदोलन ही भारताची जीवनदृष्टी पुनर्संचयित करण्यासाठी एक चळवळ होती, जी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भारतापासून वेगळे करण्यासाठी रचली जात होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी राम मंदिराच्या पायाभरणीच्या दिवशी आपल्या भाषणात तीन शब्दांचा उल्लेख केला होता. स्वावलंबी, आत्मविश्वास आणि आत्म-जागरूक. यामध्ये आत्मनिर्भरता ज्ञानाच्या संदर्भात आहे (भारतीय ज्ञान-विद्या आणि अविद्यादेखील). आत्मविश्वास हा अशा विश्वासाच्या आणि सर्जनशील दृढनिश्चयाच्या संदर्भात आहे, जो आपण आपल्या प्राचीन, नवीन, युगानुयुगे अध्यात्म आधारित एकात्मिक, सर्वांगीण समग्र जीवनाच्या चिंतनाच्या आधारे प्राप्त करू शकतो आणि हे भारतीय तत्त्वज्ञान वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आणि राष्ट्रीय जीवनात पूर्ण उत्कटतेने व्यक्त करण्यात आत्मभान आहे.

हेच श्री रवींद्रनाथ टागोर ’स्वदेशी समाज’मध्ये म्हणतात. “आपण जे आहोत ते बनूया. आपण स्वतःला पूर्णपणे, जाणूनबुजून, साधेपणाने आणि गतिशील आत्म्याने प्राप्त करूया. जितक्या खोलात जाऊन आपण आपल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मुळाशी एकरूप होऊ, तितकेच आपण आपल्या आर्थिक संपन्नता व सांस्कृतिक विस्ताराने स्पर्धा, संघर्ष, हिंसा, युद्ध, शोषण, अत्याचार याने त्रस्त असलेल्या मानवतेला संवाद, समन्वय, संयम आणि आत्मीयतेचा परिचय देऊ शकू. आपल्या आचरणाद्वारे आम्ही धार्मिक, वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण मानवी जगाला शांती आणि समृद्धीच्या मार्गावर आणि जागतिक हिताच्या मार्गावर नेण्यास आपण सक्षम होऊ.” या विचाराचे सार डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या सोमनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा भाषणातील या ओळीत दिसून येते-हे सर्व साध्य करण्यासाठी मंदिर हे मध्यवर्ती स्थान असायचे. हे मंदिरही पुन्हा असे केंद्र बनेल, अशी अपेक्षा आहे. तेव्हाच मंदिर बांधणीचे काम पूर्ण झाले, असे मी मानेन.

तीच गोष्ट आजच्या अयोध्येतील राम मंदिराबाबतही प्रासंगिक आहे. म्हणूनच संकल्पपूर्तीचा हा क्षण आणि प्रारंभही आहे. आणखी एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. असे अनेक राष्ट्रीय महत्त्वाचे प्रलंबित निर्णय एकापाठोपाठ एक होताना दिसतात. याचे कारणही महत्त्वाचे आहे. १९८७ मध्ये राम-जानकी रथयात्रा सुरू असताना, संघाच्या एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना विचारले की, “गोहत्या बंदीची चळवळ, सुधारणा, काश्मीरमधील ’कलम ३७०’ वगैरे मागणी करून यांसारखे मुद्दे आपण सोडून दिले आहेत, असे दिसते. काहीही होताना दिसत नाही. या राम मंदिराबाबतही असेच होईल का?” तेव्हा बाळासाहेबांनी उत्तर दिले की, “आपण यासाठी राष्ट्रीय प्रबोधन करतो. हे जागरण कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत केले पाहिजे. आज हिंदू समाजाच्या राष्ट्रीय चेतनेची सामान्य पातळी खूपच खालावली आहे. त्यामुळे या सर्व समस्या आहेत. ज्या दिवशी संपूर्ण समाजाच्या राष्ट्रीय चेतनेची सामान्य पातळी (general level of national consciousness) पुरेशी प्रगत होईल, तेव्हा हे सर्व प्रश्न एकाच वेळी सोडवले जाण्याची शक्यता आहे.”Malcolm Gladwell चे पुस्तक 'Tipping Point- How little things can make a big difference' मध्ये 'Tipping Point'ची व्याख्या ते असे करतात की- ''Tipping point is the point at which a series of small changes or incidents becomes significant enough to cause a larger, more important change.'' आज बाळासाहेब देवरसजी यांचे शब्द आठवले की वाटतं, ती भावना व्यक्त करताना, ते ‘टिपिंग पॉईंट’चा उल्लेख करत होते का? संघाचे थोर विचारवंत श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी नेहमी एक गोष्ट सांगत असत की, समाजातील काही लोक राष्ट्रीय स्तरावर जागृत आणि अतिशय सक्रिय असण्याने शाश्वत बदल होत नाही. सामान्य माणसाच्या राष्ट्रीय जाणिवेचा स्तर थोडासाही उंचावला की, मोठे बदल घडतात.
 
त्यामुळे वेळोवेळी काही मुद्द्यांवर राष्ट्रीय जागृतीसाठी सातत्याने प्रयत्न केल्यास, सामान्य माणसाच्या राष्ट्रीय जाणिवेचा स्तर हळूहळू उंचावेल. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून राष्ट्रहिताची अनेक छोटी-मोठी महत्त्वाची आणि आवश्यक कामे सुलभ होतील. या कारणास्तव राष्ट्रीय चेतना समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून, काही लोकांसाठी राष्ट्रीय प्रबोधनाच्या कार्यात सतत व्यस्त राहणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे.बाळासाहेब देवरस आणि दत्तोपंत ठेंगडी यांनी वर्णन केलेला ‘टिपिंग पॉईंट’जवळ येत आहे. रवींद्रनाथ टागोरांचा आदिवासी समाज सक्रिय होत आहे, असे दिसते. राष्ट्रीय जीवनाच्या अनेक क्षेत्रांत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले राष्ट्रहिताचे मूलभूत बदल एकामागून एक होत आहेत. देशाच्या संरक्षण धोरणात आणि परराष्ट्र धोरणात जग मूलभूत बदल अनुभवत आहे. विकेंद्रित आणि शेतीवर आधारित आर्थिक धोरणाच्या आधारे स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त होत आहे. भारताच्या मुळाशी जोडून उंच उडण्यासाठी आणि जगाच्या आकाशाला गवसणी घालण्यासाठी पंख देणारे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. समाजाच्या स्वतःच्या उपक्रमांना आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी वातावरण तयार केले जात आहे. हे सर्व एकाच वेळी होताना दिसते. २०१४ पासून भारतात झालेल्या केंद्रातील सत्ताबदलाशी हा बदल पाहणे स्वाभाविक आहे.

दि. १६ मे २०१४ रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर दि. १८ मे रोजी ब्रिटनच्या ‘संडे गार्डियन’ने आपल्या महत्त्वाच्या संपादकीय लेखात एक गोष्ट अगदी स्पष्ट केली की, ''Today, 18 May, 2014, may well go down in history as the day when Britain finally left India.'' यासोबतच आणखी एक मूलभूत आणि सखोल गोष्ट या संपादकीय लेखात मांडण्यात आली आहे. ती म्हणजे - ''It should be obvious that underlying changes in Indian society have brought us Mr Modi and not the other way round.'' राष्ट्रीय चेतनेचा सामान्य स्तर उंचावण्याच्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून, सर्व प्रकारचे अनुकूल बदल घडू लागले आहेत आणि सत्ता परिवर्तन हादेखील त्याचाच एक भाग आहे. देवाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी भारत आपल्या जुन्या, सदैव नवीन, शाश्वत शक्तीसह उभा आहे. (संघाच्या एका ज्येष्ठ प्रचारकाने एका वाक्यात संघाचे संपूर्ण वर्णन केले होते-”रा. स्व. संघ हे या हिंदू राष्ट्राच्या जीवनकार्याची उत्क्रांती आहे.” आजवर ठप्प झालेली किंवा थांबलेली सर्व आवश्यक कामे होऊ लागली आहेत. संपूर्ण समाजाला सावध आणि सक्रिय व्हावे लागेल, ही तीच आत्मजागरूकता आहे. ज्यातून आवश्यक आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता अपरिहार्य आहे.संघाच्या गीतातही म्हटले आहे की,

अरुणोदय हो चुका वीर अब
कर्मक्षेत्र में जुट जाएँ
अपने खून-पसीने द्वारा
नवयुग धरती पर लाएँ...
 

 
 
डॉ. मनमोहन वैद्य
(लेखक रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह आहेत.)
(अनुवाद : ओंकार मुळ्ये)


अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121