पंतप्रधानांचे नाशिकमध्ये मराठीतून भाषण; पुढची पिढी नाव काढेल अस काम करा युवकांना केले आवाहन
लवकरच देशाला जगातली तीसरी मोठी अर्थव्यवस्था बनवायच आहे अस आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवकांना केल
12-Jan-2024
Total Views | 45
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज १२ जानेवारीला युवा दिन दिवशी नाशिक मध्ये युवा मोहोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मान्यवर उपस्थीत होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी मराठी मध्ये राजमाता जिजाऊंना वंदन केले.
"राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती दिनी मला त्यांना वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीत येण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो" अस ते यावेळी म्हणाले. भारताच्या अनेक महान हस्तींचा महाराष्ट्राशी असलेला संबंध हा केवळ एक योगायोग नसुन या पुण्यभूमीचा, वीरभूमीचा आणि तपोभूमीचा प्रभाव आहे. असही ते यावेळी म्हणाले. या महाराष्ट्राच्या भूमीने आपल्याला माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यविर सावरकर, अनंत कान्हेरे, चाफेकर बंधू , दादासाहेब पोतनिस यांसारखे वीर आपल्याला दिले आहेत. अस ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
२२ जानेवारीला होणाऱ्या राममंदिराच्या उद्घाटनानिमीत्त भारतातील मंदिरांची साफसफाई करण्याचे आवाहन मोदींनी केले होते. त्याची आठवण करुन देत त्यांनाही काळाराम मंदिरात ते करण्याची संधी मिळाली अस त्यांनी यावेळी म्हटल आहे. आपणही सर्वांना देशभरातील मंदिरे स्वच्छ करण्यात श्रमदान करावे अस आवाहन त्यांनी केले.
स्वामी विकानंदांनी सांगितल्यानुसार भारताचा विकास येथील युवा वर्गाच्या प्रतिबद्धतेवर टिकून आहे. भारत आज जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांत आला आहे. त्यामागे भारतातील युवावर्गाची ताकद आहे अस यावेळी ते म्हणाले.
यानंतर पंतप्रधान मोदींनी पाचवी मोठी अर्थव्यवस्था, उत्पादनाचे हब, १० वर्षात सरकारने युवांना दिलेल्या संधी, चंद्रयान, आदित्य एल १, युपीआय, स्वस्त इंटरनेट यांसारख्या कामांचा उल्लेख करत. मागच्या सरकारपेक्षा दुप्पट वेगाने काम झाल्याच सांगितल. देशाच्या विकासात युवा वर्गाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मिळेल त्या संधीच सोन करा. पुढची पिढी नाव काढेल अस काम करा. आपल्याला लवकरच देशाला जगातली तीसरी मोठी अर्थव्यवस्था बनवायच आहे अस आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवकांना केल आहे.
नाशिक मध्ये युवा मोहोत्सवाचे उद्घाटनापुर्वी नरेंद्र मोदींनी तेथे रोडशो केला, त्यावेळी त्यांच्यासोबत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकुंड येथे गोदावरी पुजा केली. व काळाराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शनही घेतले. नाशिकमध्ये सभेला संबोधित करुन पंतप्रधान मोदी मुंबई कडे रवाना होतील. तेथे ते अटल सेतु म्हणजेच शिवडी न्हावा-शेवा सागरी सेतुचे उद्घाटन करणार आहेत.