मुंबई : 'भारतीय क्रीडा प्राधिकरण'अंतर्गत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात क्रीडा प्राधिकरणाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणांतर्गत एकूण २१४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (SAI) भरतीसंदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक.
शैक्षणिक पात्रता -
पदांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण समकक्ष डिप्लोमा आवश्यक.
वयोमर्यादा -
सहाय्यक प्रशिक्षक - ४० वर्षे
प्रशिक्षक - ४५ वर्षे
वरिष्ठ प्रशिक्षक - ५० वर्षे
उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक - ६० वर्षे
वेतनश्रेणी -
उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक - लेव्हल १३
वरिष्ठ प्रशिक्षक - लेव्हल ११
प्रशिक्षक - लेव्हल १०
सहाय्यक प्रशिक्षक - लेव्हल ६
अर्ज स्वीकृतीस सुरूवात दि. १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होईल.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३० जानेवारी २०२४ पर्यंत असेल.
'भारतीय क्रीडा प्राधिकरण'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा