महाराष्ट्र : नागपुरातील करोडो किमतीच्या जमिनीवरून व्यापारी गोदरेज प्रॉपर्टीज आणि अग्रवाल कुटुंब यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे मुस्लिम वैयक्तिक कायदा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणी जमीन आपल्या नावे करण्याचे कटकारस्थान या कायद्यामुळे बाहेर आले आहे. मुस्लिम वैयक्तिक कायदा विधवेला जमीन विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा अधिकार देत नाही, असे कायद्यातून स्पष्ट होते.
दरम्यान, 'आई ही अल्पवयीन मुलांची पालक नाही, विधवा महिलेला मालमत्ता विकण्याचा अधिकार नाही', तसेच, मुस्लिम वैयक्तिक कायद्यातून असे स्पष्ट होते की, विधवेला जमीन विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा अधिकार देत नाही. आता या इस्लामी कायद्याचा आधार घेऊन विधवा व्यक्तीचे वारस कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
गोदरेजशी संबंधित जमिनीचा वाद आणि मुस्लिम वैयक्तिक कायद्याची भूमिका या संपूर्ण प्रकरणातून समोर आली आहे. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण १९८८ चे असून अब्दुल वहाब नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीकडे महाराष्ट्रातील नागपूरमधील बेसा भागातील घोगली गावात ५८ एकर जमीन होती. अब्दुल वहाब यांच्या मृत्यूनंतर ही जमीन त्यांच्या विधवा खैरुन्निसा यांनी अग्रवाल कुटुंबाला विकली होती. ही जमीन किती विकली, याची माहिती उपलब्ध नाही. या विकलेल्या जमिनीत खैरुन्निसा यांच्या ८ मुलांचे शेअर्सही होते.
मात्र, अब्दुल वहाब यांचा मुलगा अब्दुल बशीर याने या जमिनीच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तक्रार दाखल केली. या तक्रारीद्वारे बशीर यांनी दावा केला की, मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार पतीच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी कायदेशीर पालक असू शकत नाही. त्यामुळेच ती मुलांचा हिस्सा विकू शकत नाही. अशा स्थितीत जमिनीची विक्री बेकायदेशीर आहे, असे या प्रकरणातून समोर आले आहे.